जयपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडून नये, पोखरण (जैसलमेर) येथील मदरशाचे प्रमुख मोहम्मद आमीन यांनी केले आहे.
काही लोक जमातमध्ये (सामूहीक) नमाज पठण करत आहेत. त्यांना आमीन यांनी आवाहन केले की, प्रेषित मोहम्मद सल्ललाहु अलैही वसल्लम यांनी महामारीच्या वेळी ज्या ठिकाणी आपण आहोत, त्यांना त्याच ठिकाणी राहण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आहे त्याच ठिकाणी सुरक्षित रहा. विनाकारण घराबाहेर पडू नका. नमाज अदा करायची असेल तर ती घरातच अदा करा. प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन केले
हेही वाचा - सावधान ! दिवे अन् मेणबत्ती लावतांना 'हॅन्ड सॅनिटायझर'चा वापर टाळा, नाही तर...