हैदराबाद - विमानाची तिकिटे ऑनलाईन बुकिंग करायला सांगून तिकिटाचे पैसे न देता २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन व त्याचा स्वीय सहायकावर औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दाखल केलेला गुन्हा खोटा असून तक्रारदाराविरोधात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे स्पष्टीकरण अझरुद्दीन याने दिले आहे.
दाखल केलेला गुन्हा आणि दिलेली तक्रार हा फक्त तक्रारदाराने प्रकाशझोतात राहण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. यात काहीच तथ्य नसून हा गुन्हा खोटा असल्याचे अझरुद्दीन याने सांगितले आहे. तसेच यासंदर्भात वकिलांसोबत चर्चा करून 100 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे स्पष्टीकरण मोहम्मद अझहरुद्दीन याने दिले आहे.
यासंदर्भातली सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा - माजी क्रिकेटर अझहरुद्दीनसह तिघांवर औरंगाबादेत फसवणुकीचा गुन्हा दाखल