नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी वाराणसी-प्रयागराज 6 पदरी महामार्गाचे लोकर्पण केले. त्यानंतर खजुरीमध्ये त्यांनी सभेला संबोधित केले. यावेळी मोदींनी कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात हर-हर महादेवचा उच्चार करत भोजपूरीमधून केली. सभेनंतर मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडोरची पाहणी केली. राजघाटावर मोदींनी पहिला दिवा लावल्यानंतर दिव्यांच्या लख्ख प्रकाश राजघाटावर पसरला. त्यानंतर पुन्हा देवदीवाळी पर्वाला मोदींनी संबोधीत केले. मोदींनी काशी विश्वनाथ मंदीरात पूजा देखील केली.
भाषणातील प्रमुख मुद्दे -
कोरोनामुळे अनेक गोष्टी बदलल्या. मात्र, काशीमधील शक्ती, भक्ती आणि उर्जा बदलली नाही.
आपल्या दृष्टीने हेरिटेज म्हणजे देशाचा वारसा. वारसा म्हणजे, काही लोकांसाठी, त्यांचे कुटुंब आणि त्यांचे कुटुंबाचे नाव असते. मात्र, आमच्यासाठी वारसा म्हणजे आपली संस्कृती, आपला विश्वास.
खजुरी येथील सभेतील मुद्दे -
मला आजही आठवते. जेव्हा 2013 ला माझी येथे सभा झाली होती. तेव्हा इथला महामार्ग चार पदरी होती. आज हा महामार्ग सहा पदरी केला आहे. राज्याचा विकास झाला असून उत्तर प्रदेश एक्सप्रेस प्रदेश म्हणून नावारुपाला येत आहे.
शेतकऱ्यांना भविष्याची भिती दाखवून घाबरवण्यात येत आहे. पूर्वी बाजारपेठेत गैरव्यव्हार व्हायचा. त्यामुळे लहान व्यवसायीकांचे नुकसान होत. मात्र, आता शेतकऱयांना कायद्याचे संरक्षण मिळाले आहे.
पुर्वी एमएसपी व्यवस्था होती. मात्र, त्यावर खरेदी कमी व्हायची. गेली अनेक वर्ष एमएसपीच्या नावाखाली घोटाळे करण्यात आले. शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफीचे पॅकेज घोषीत करण्यात आले. मात्र, त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचला नाही.
गंगाजला इतक्या पवित्र मनाने काम करत आहे आणि एकादिवशी हे सर्वांसमोर सिद्ध होईल. पूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होत. मात्र, 1 रुपयांपेकी फक्त 15 पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहचत. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कायदे आणले आहेत आणि एक दिवस यावर सकारत्मक चर्चाही होईल, असे मोदी म्हणाले.