पाटना - लोकसभा निवडणुकींचा प्रचार सुरू झाला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्याची एकही संधी राजकीय पक्ष सोडत नाहीत. होळीच्या सणाचाही विविध पक्ष पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बिहारच्या बाजारात नरेंद्र मोदी, नितीश कुमार आणि लालुप्रसाद यादव यांच्यापासून प्रेरीत पिचकाऱ्या बाजारात पहायला मिळत आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी होळीचा उपयोग प्रचारासाठी अभिनव पद्धतीने केला. त्यांनी लोकांना शौर्य गुलालाचे पाकिट वाटले. तसेच, नरेंद्र मोदींच्या पिचकाऱ्या बाजारात विक्रीस ठेवलेल्या दिसल्या. लोकांच्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीचा वापर प्रचारासाठी करण्याचा प्रयत्न राजकारणी करत आहेत. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथांपासून प्रेरीत पगड्यांची बाजारात मागणी असल्याची माहिती बिहारमधील व्यापाऱ्यांनी दिली. प्रचार करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजीही राजकारणी घेताना दिसत आहेत.
देशभरामध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे. हे मतदान सात टप्प्यात होईल. ११ एप्रिलला सुरुवात होऊन १९ मे ला याचा शेवट होईल. २३ मे ला देशाला नवीन सरकार मिळेल.