ETV Bharat / bharat

राहुल गांधींकडून अडवाणींचा पुन्हा अपमान; म्हणाले - 'मोदींनी लाथ मारून हाकलले'

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही काँग्रेस हताश झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्याकडून निवडणुकीचा स्तर खालच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल यांना कदाचित सभ्यता येतही नाही.

'मोदींनी लाथ मारून हाकलले'
author img

By

Published : Apr 6, 2019, 9:50 PM IST

नवी दिल्ली/हरिद्वार - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. येथे केलेल्या भाषणात पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संस्थापक लाल कृष्ण अडवाणी यांच्यावरून त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. मात्र, असे करताना त्यांनी अडवाणी यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरली आहे. 'मोदींनी अडवाणींना लाथ मारून स्टेजवरून खाली उतरवले,' असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, गुरुचा अपमान करणे ही भारतीय संस्कृती नव्हे, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात राहुल यांनी दुसऱ्यांदा अपमानास्पद भाषा वापरली आहे. 'नरेंद्र मोदी हिंदू धर्माबद्दल सांगतात. हिंदू धर्मात गुरु सर्वांत मोठा आणि आवश्यक असतो. अडवाणी नरेंद्र मोदींचे गुरु आहेत. अडवाणींची परिस्थिती पाहिली तुम्ही? मोदींनी अडवाणींना लाथ मारून स्टेजवरून खाली उतरवले,' असे ते म्हणाले. 'याआधी अडवाणींना बुटाने मारून बाहेर काढण्यात आले,' असे त्यांनी म्हटले होते.

राहुलजी, मर्यादेत रहा...

राहुल यांच्या वक्तव्यावर भाजपतील अनेक नेत्यांनी आक्षेप दर्शवला होता. तसेच, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींना मर्यादेत रहायला सांगितले होते. 'अडवाणी आम्हाला वडिलांसारखे आहेत. तुमच्या त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलण्याने आम्हा सर्वांना वेदना दिल्या आहेत. कृपया तुम्ही तुमच्या बोलण्यात मर्यादा राखा,' असे ट्विट स्वराज यांनी केले होते.

  • राहुल जी - अडवाणी जी हमारे पिता तुल्य हैं. आपके बयान ने हमें बहुत आहत किया है. कृपया भाषा की मर्यादा रखने की कोशिश करें. #Advaniji
    Rahulji - Advani ji is our father figure. Your words have hurt us deeply. Please try to maintain some decorum of your speech. #Advaniji

    — Chowkidar Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही काँग्रेस हताश झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्याकडून निवडणुकीचा स्तर खालच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल यांना कदाचित सभ्यता येतही नाही.उत्तराखंडच्या दौऱ्यावर राहुल गांधींनी श्रीनगर गढवालमध्ये पहिल्या सभेला संबोधित केले. त्यांनी अल्मोडा आणि हरिद्वार येथेही सभेत भाषण केले. याआधी त्यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे पंतप्रधान मोदींवर अडवाणी यांना अपमानित करून बुटाने मारून व्यासपीठावरून खाली फेकून दिल्याचे म्हटले होते. अडवाणी यांनी ब्लॉग लिहिल्यानंतर राहुल यांनी मोदींवर वारंवार हल्ला चढविला आहे. अडवाणी यांनी 'भाजपने आपल्या राजकीय विरोधकाला राष्ट्रद्रोही कधीही मानले नाही,' असे म्हटले होते.'भाजप हिंदुत्वाच्या गोष्टी करत आहे. हिंदुत्वात गुरु सर्वोच्च असतो. ते गुरु-शिष्य परंपरेविषयी बोलतात. अडवाणी नरेंद्र मोदींचे गुरु आहेत. मोदींनी त्यांना बोहेरचा रस्ता दाखवला (बुटाने मारून व्यासपीठावरून उतरवले).' असे राहुल शुक्रवारी म्हणाले होते. त्यांच्या टिप्पणीवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.अडवाणी यांना गुजरातच्या गांधीनगरच्या जागेसाठी भाजपची उमेदवारी देण्यात आलेली नाही. तेथून स्वतः भाजप अध्यक्ष अमित शाह लढणार आहेत.

Intro:Body:

राहुल गांधींकडून अडवाणींचा पुन्हा अपमान; म्हणाले - 'मोदींनी लाथ मारून हाकलले'

नवी दिल्ली/हरिद्वार - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. येथे केलेल्या भाषणात पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संस्थापक लाल कृष्ण अडवाणी यांच्यावरून त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. मात्र, असे करताना त्यांनी अडवाणी यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरली आहे. 'मोदींनी अडवाणींना लाथ मारून स्टेजवरून खाली उतरवले,' असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, गुरुचा अपमान करणे ही भारतीय संस्कृती नव्हे, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात राहुल यांनी दुसऱ्यांदा अपमानास्पद भाषा वापरली आहे. 'नरेंद्र मोदी हिंदू धर्माबद्दल सांगतात. हिंदू धर्मात गुरु सर्वांत मोठा आणि आवश्यक असतो. अडवाणी नरेंद्र मोदींचे गुरु आहेत. अडवाणींची परिस्थिती पाहिली तुम्ही? मोदींनी अडवाणींना लाथ मारून स्टेजवरून खाली उतरवले,' असे ते म्हणाले. 'याआधी अडवाणींना बुटाने मारून बाहेर काढण्यात आले,' असे त्यांनी म्हटले होते.

राहुलजी, मर्यादेत रहा...

राहुल यांच्या वक्तव्यावर भाजपतील अनेक नेत्यांनी आक्षेप दर्शवला होता. तसेच, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींना मर्यादेत रहायला सांगितले होते. 'अडवाणी आम्हाला वडिलांसारखे आहेत. तुमच्या त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलण्याने आम्हा सर्वांना वेदना दिल्या आहेत. कृपया तुम्ही तुमच्या बोलण्यात मर्यादा राखा,' असे ट्विट स्वराज यांनी केले होते.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही काँग्रेस हताश झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्याकडून निवडणुकीचा स्तर खालच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल यांना कदाचित सभ्यता येतही नाही.

उत्तराखंडच्या दौऱ्यावर राहुल गांधींनी श्रीनगर गढवालमध्ये पहिल्या सभेला संबोधित केले. त्यांनी अल्मोडा आणि हरिद्वार येथेही सभेत भाषण केले. याआधी त्यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे पंतप्रधान मोदींवर अडवाणी यांना अपमानित करून बुटाने मारून व्यासपीठावरून खाली फेकून दिल्याचे म्हटले होते. अडवाणी यांनी ब्लॉग लिहिल्यानंतर राहुल यांनी मोदींवर वारंवार हल्ला चढविला आहे. अडवाणी यांनी 'भाजपने आपल्या राजकीय विरोधकाला राष्ट्रद्रोही कधीही मानले नाही,' असे म्हटले होते.

'भाजप हिंदुत्वाच्या गोष्टी करत आहे.  हिंदुत्वात गुरु सर्वोच्च असतो. ते गुरु-शिष्य परंपरेविषयी बोलतात. अडवाणी नरेंद्र मोदींचे गुरु आहेत. मोदींनी त्यांना बोहेरचा रस्ता दाखवला (बुटाने मारून व्यासपीठावरून उतरवले).' असे राहुल शुक्रवारी म्हणाले होते. त्यांच्या टिप्पणीवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

अडवाणी यांना गुजरातच्या गांधीनगरच्या जागेसाठी भाजपची उमेदवारी देण्यात आलेली नाही. तेथून स्वतः भाजप अध्यक्ष अमित शाह लढणार आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.