नवी दिल्ली - जम्मू काश्मीर राज्यातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा ५ ऑगस्टपासून बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता जम्मूमधील ५ जिल्ह्यातील मोबाईल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. संपर्क व्यवस्था बंद ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मोबाईल सेवा सुरू करण्यात आल्याने लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
-
Mobile phone services snapped across #JammuAndKashmir since August 5, resumed in five districts of Jammu region- DODA, KISHTWAR, RAMBAN, RAJOURI and POONCH pic.twitter.com/DO6BK3halF
— ANI (@ANI) August 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mobile phone services snapped across #JammuAndKashmir since August 5, resumed in five districts of Jammu region- DODA, KISHTWAR, RAMBAN, RAJOURI and POONCH pic.twitter.com/DO6BK3halF
— ANI (@ANI) August 29, 2019Mobile phone services snapped across #JammuAndKashmir since August 5, resumed in five districts of Jammu region- DODA, KISHTWAR, RAMBAN, RAJOURI and POONCH pic.twitter.com/DO6BK3halF
— ANI (@ANI) August 29, 2019
जम्मूमधील दोडा, किश्तवार, रामबन, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. याआधी काश्मीरमधील काही भागामध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, अफवा पसरण्याच्या शक्यतेने पुन्हा बंद करण्यात आली होती. राज्यातील स्थिती पूर्ववत होत असल्याचे यातून दिसून येत आहे.
काश्मीरमध्ये आत्तापर्यंत कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, ज्या लोकांनी हिंसा घडवण्याचा प्रयत्न केला त्यातील काही जखमी झाले आहेत. सरकारने ३७० कलम हटवण्याचा निर्णय काश्मीरमधल्या लोकांच्या भल्यासाठी घेतला असून लवकरच राज्यामध्ये ५० हजार सरकारी नोकरभरती करण्यात येणार आहे, असे जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले.
प्रत्येक काश्मिरीचे जीवन अमूल्य आहे, तसेच काश्मीरमधील नागरिक सहकार्य करत आहेत. हळूहळू राज्यातील स्थिती पूर्वपदावर येत आहे. यापुढे जम्मू काश्मीरसह लडाखचा इतका विकास होईल की, पाकव्याप्त काश्मिरातील नागरिकही विकसाची मागणी करतील, असे राज्यापाल मलिक म्हणाले. सरकार कोणतीही आकडेवारी लपवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.