नवी दिल्ली - विवाह समारंभात समोर जेवायला बसल्याने एका दलित तरुणाला बेदम मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तराखंडच्या तेहरी जिल्ह्यात २६ एप्रिलला मारहाणीची घटना घडली होती. डेहराडून येथे उपचार सुरू असताना सोमवारी या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी ७ आरोपींपैकी ३ जणांना ताब्यात घेतले असून सर्व आरोपींविरोधात अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपाधीक्षक उत्तम सिंह जिमवाल यांच्या माहितीनुसार, दलित तरुण जितेंद्र (वय २१) हा कथित कनिष्ठ जातीचा होता. त्यामुळे त्याने लग्नात आपल्या समोर बसून जेवण करणे कथित सवर्ण जातीतील काही लोकांना रुचले नाही. त्यामुळे राग अनावर होऊन ७ जणांनी जितेंद्रला बेदम मारहाण केली. गजेंद्र सिंह, सोबन सिंह, कुशल सिंह, गब्बर सिंह, गंभीर सिंह, हरबीर सिंह आणि हुकूम सिंह अशी या सात जणांची नावे आहेत. २६ एप्रिल रोजी तेहरी जिल्ह्यातील श्रीकोट गावातील एका विवाह समारंभादरम्यान ही घटना घडली होती.
मारहाणीदरम्यान जितेंद्र गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यानंतर नऊ दिवसांनी उपचारांदरम्यान त्याने डेहराडूनमधील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत तरुण जितेंद्रच्या बहिणीच्या तक्रारीवरुन सात जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे जिमवाल यांनी सांगितले.
Mob lynching : लग्नाच्या पंगतीत समोर जेवायला बसल्याने दलित तरुणाला बेदम मारहाण करुन हत्या - sitting eating front
मारहाणीदरम्यान जितेंद्र गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यानंतर नऊ दिवसांनी उपचारांदरम्यान त्याने डेहराडूनमधील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत तरुण जितेंद्रच्या बहिणीच्या तक्रारीवरुन सात जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - विवाह समारंभात समोर जेवायला बसल्याने एका दलित तरुणाला बेदम मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तराखंडच्या तेहरी जिल्ह्यात २६ एप्रिलला मारहाणीची घटना घडली होती. डेहराडून येथे उपचार सुरू असताना सोमवारी या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी ७ आरोपींपैकी ३ जणांना ताब्यात घेतले असून सर्व आरोपींविरोधात अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपाधीक्षक उत्तम सिंह जिमवाल यांच्या माहितीनुसार, दलित तरुण जितेंद्र (वय २१) हा कथित कनिष्ठ जातीचा होता. त्यामुळे त्याने लग्नात आपल्या समोर बसून जेवण करणे कथित सवर्ण जातीतील काही लोकांना रुचले नाही. त्यामुळे राग अनावर होऊन ७ जणांनी जितेंद्रला बेदम मारहाण केली. गजेंद्र सिंह, सोबन सिंह, कुशल सिंह, गब्बर सिंह, गंभीर सिंह, हरबीर सिंह आणि हुकूम सिंह अशी या सात जणांची नावे आहेत. २६ एप्रिल रोजी तेहरी जिल्ह्यातील श्रीकोट गावातील एका विवाह समारंभादरम्यान ही घटना घडली होती.
मारहाणीदरम्यान जितेंद्र गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यानंतर नऊ दिवसांनी उपचारांदरम्यान त्याने डेहराडूनमधील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत तरुण जितेंद्रच्या बहिणीच्या तक्रारीवरुन सात जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे जिमवाल यांनी सांगितले.
Mob lynching : लग्नाच्या पंगतीत समोर जेवायला बसल्याने दलित तरुणाला बेदम मारहाण करुन हत्या

Conclusion: