ETV Bharat / bharat

जयपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक - Jaipur rape case

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही हांडीपोरा गावचे रहिवासी होते. पीडिता काही कामासाठी घरातून बाहेर पडली असता, या तिघांनी तिला उचलून एका निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर हे तिघेही तेथून पळून गेले.

Minor girl abducted, gang-raped in Jaipur; 3 held
जयपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक
author img

By

Published : Oct 1, 2020, 7:23 AM IST

जयपूर : तीन नराधमांनी एका अल्पवयीन मुलीला उचलून नेत, तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार राजस्थानमध्ये समोर आला आहे. जयपूरच्या हांडीपोरा गावामध्ये बुधवारी ही घटना घडली. या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जयपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक

कालू, विक्रम आणि जीतू अशी या आरोपींची नावे आहेत. आमेर पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही याच गावचे रहिवासी होते. पीडिता काही कामासाठी घरातून बाहेर पडली असता, या तिघांनी तिला उचलून एका निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर हे तिघेही तेथून पळून गेले.

पीडितेने घरी परत येत आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला, ज्यानंतर तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली. सध्या हे तिघे पोलीस कोठडीत असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा : 'हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण निंदनीय आणि अन्यायकारक'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.