ETV Bharat / bharat

भारताची चीनविरोधात दुसरी मोठी कारवाई... पबजीसह 118 मोबाईल ‌अ‌ॅपवर बंदी - #PUBG

पबजीसह 118 चीनी मोबाईल अ‌ॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

पबजी
पबजी
author img

By

Published : Sep 2, 2020, 5:29 PM IST

Updated : Sep 2, 2020, 7:43 PM IST

नवी दिल्ली - सध्या भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनच्या 59 अ‌ॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याच्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर भारताने कठोर पाऊल उचलत पुन्हा एकदा चीनच्या 118 अ‌ॅप बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, या अ‌ॅपमध्ये पबजी या गेमचाही समावेश आहे.

  • Government blocks 118 mobile apps which are prejudicial to sovereignty and integrity of India, Defence of India, Security of State and Public Order: Govt of India https://t.co/oLcI68vu56

    — ANI (@ANI) September 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बंदी घातलेल्या या अ‌ॅपमध्ये पबजी लाईट, वूई चॅट वर्क, कॅमेरा सेल्फी संर्दभातील विविध अ‌ॅप, म्युझिक प्लेअर एमपी 3, वेब ब्राऊझर, फोटो गॅलरी आणि अ‌ॅप लॉक यासारख्या अ‌ॅपचा समावेश आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे.

  • Government blocks 118 mobile apps which are prejudicial to sovereignty and integrity of India, Defence of India, Security of State and Public Order: Govt of India

    PUBG MOBILE Nordic Map: Livik, PUBG MOBILE LITE, WeChat Work & WeChat reading are among the banned mobile apps. pic.twitter.com/VWrg3WUnO8

पबजी गेमवर बंदीच्या काही वेळानंतर टि्वटर #PUBG हा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला आहे. यापूर्वी सरकारने बंदी घातलेल्या अ‌ॅपमध्ये पबजीचा समवेश नव्हता. तरुणाईमध्ये पबजी अ‌ॅप हे लोकप्रिय आहे. त्यामुळे या बंदीवर तरुणाई कसा प्रतिसाद करते, हे पाहणे म्हत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, २९ जूनला सरकारने टिकटॉक, यूसी ब्राऊझर, कॅम स्कॅनर अशा ५९ चिनी अ‌ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेला तसेच सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणारे हे अ‌ॅप्स असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

Last Updated : Sep 2, 2020, 7:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.