चंदीगढ- पोटाची आग विझवण्यासाठी शेकडो किलोमीटर दूर पंजाबमध्ये राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांना कधीच स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते की त्यांना अशी वेळ येईल. केवळ सायकल खरेदीसाठी शेतात मजुरी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या सायकलद्वारे या मजुरांनी 750 किलोमीटरचा प्रवास सुरू केला.
हेही वाचा- "राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री ठाकरेंना विधान परिषदेवर नियुक्ती देण्यात कोणत्या अडचणी आहेत?"
सायकलवर काही खाद्यपदार्थ, काही कपडे, हवा भरण्याचा पंप आणि सोबतीला पाणी घेऊन या मजुरांनी आपल्या मुळ गावाकडे प्रवास सुरू केला. जवळपास 750 किलोमीटर प्रवासात कोणत्याही परिस्थितीत घरी पोहोचण्याचे लक्ष्य त्याचे होते. हे मजूर पंजाबच्या बठिंडामध्ये अडकले होते. त्यांची त्या ठिकाणी उपासमार होत होती. त्यामुळे त्यांनी गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, गावाकडे जाण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. करायचे काय? त्यामुळे त्यांनी तेथील परिसरात शेतात मजुरी करुन सायकल खरेदी केली. सायकवरुन शेकडो किमीचा प्रवास सुरू केला.