ETV Bharat / bharat

'जेईई-नीट' ढकलल्या पुढे; आता सप्टेंबरमध्ये होणार परीक्षा..

Medical entrance exam NEET postponed to September 13 in view of COVID-19 pandemic HRD Ministry.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'जेईई-नीट' ढकलल्या पुढे; आता सप्टेंबरमध्ये होणार परीक्षा..
author img

By

Published : Jul 3, 2020, 7:47 PM IST

Updated : Jul 3, 2020, 10:19 PM IST

22:09 July 03

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' (NEET), आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा 'जेईई' (JEE) या १३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी एक ट्विट करून यासाठीची घोषणा केली आहे. देशातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच आम्ही यासाठीचे नियोजन केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

19:43 July 03

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'जेईई-नीट' ढकलल्या पुढे; आता सप्टेंबरमध्ये होणार परीक्षा..

देशभरात जेईई-मेन ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत दरम्यान घेतली जाणार आहे. जेईई-ॲडव्हान्स ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी देशभरात घेतली जाईल अशी माहिती पोखरियाल यांनी दिली. 
तर वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले नीट-२०२० ही सामाईक प्रवेश परीक्षा देशभरात 13 सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे यासाठीची माहिती ही पोखरियाल यांनीे दिली.

देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या सर्व सामाईक परीक्षा आणि त्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. देशात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात असल्याने या परीक्षा केव्हा होतील, असा प्रश्न देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये चर्चिला जात होता. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी आज या समाईक प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

हेही वाचा : आपला देश कोणत्याही महाशक्तीपुढे झुकणार नाही, पंतप्रधानांचा जखमी जवानांना संदेश..

Last Updated : Jul 3, 2020, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.