भोपाळ - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असलेले मास्क आणि सॅनिटायझरचा मोठा तुटवडा सध्या बाजारामध्ये निर्माण झाला. त्यामुळे सॅनिटायझर आणि मास्कची निर्मिती करण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे. यासाठीच मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील बचतगटांच्या महिलांनी प्रशासनाच्या मदतीने मास्क आणि सॅनिटायझरची निर्मिती केली आहे. हे मास्क आणि सॅनिटायझर या महिला गरजूंना वाटतात.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील 23 बचत गटांतील महिलांनी बँकेकडून कर्ज घेऊन मास्क व सॅनिटायझर बनविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दररोज एक हजाराहून अधिक मास्क बनवून बँका, पोलीस, आरोग्य विभाग तसेच गरजू लोकांना याचे वाटप केले जाते.
- आतापर्यंत 12 हजाराहून अधिक मास्क तयार -
बोरगावच्या बचतगटाच्या अध्यक्षांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, त्यांच्या गटाने आतापर्यंत 12 हजाराहून अधिक मास्क तयार करून प्रशासनाकडे पाठवले आहेत. या कामातून ते जनतेची मदत करत असून महिलांना रोजगारही उपलब्ध होत आहे. बचतगटांच्या या महिलाही मोठ्या प्रमाणात स्वच्छताविषयक काम केली आहेत. आतापर्यंत 2200 लीटर सॅनिटायझर बनवून महिलांनी त्याची विक्री केली गेली आहे.
- स्वस्त दरात मास्क आणि सॅनिटायझर -
विशेष म्हणजे या मास्कची किंमत 10 रुपये ठेवली गेली आहे. तर सॅनिटायझर देखील स्वस्त दराने विकले जात आहे. जेणेकरून सामान्य लोकांना ते घेण्यास त्रास होऊ नये. खंडवा जिल्हाधिकारी तन्वी सुंदरियाल यांनीही खंडवा जिल्ह्यातील बचत गटातील या महिलांचे कौतुक केले आहे.