हैदराबाद : तेलंगाणाच्या भद्राद्री-कोथागुडम जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी रस्ता बांधकाम थांबवण्यासाठी वाहने पेटवल्याची घटना घडली आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील दत्त यांनी याबाबत माहिती दिली आहे. भद्राद्री-कोथागुडम जिल्हा हा छत्तीसगडला लागून आहे. याठिकाणी सुरू असलेले रस्त्याचे काम थांबवण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी एक बुलडोजर आणि एक रोड-रोलर पेटवून दिला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. यानंतर माओवाद्यांनी गावकऱ्यांना धमकीही दिली. त्यानंतर ते तिथून पसार झाले. त्यांचा तपास सुरू असल्याचेही दत्त यांनी सांगितले.
मागील आठवड्यातही, सीपीआय (माओवादी) राज्य समितीचा सदस्य भास्कर याच्या नेतृत्वाखाली काही माओवाद्यांची पोलिसांसोबत चकमक झाली होती. कोमाराम भीम जिल्हा आणि भद्राद्री-कोथागुडम जिल्ह्याच्या वन परिसरात हा प्रकार घडला. या चकमकीत सर्व माओवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. भास्करवर सध्या २५ लाखांचे बक्षीस आहे.
यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात माओवाद्यांसाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
हेही वाचा : कायदा आल्यानंतर तिहेरी तलाकची 82 टक्के प्रकरणं घटली - अल्पसंख्यांक मंत्री