कोरोनाचा प्रादुर्भाव उच्च पदस्थ सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सातत्याने पसरत आहे. ही एक चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे सरकारला मंगळवारी नव्या सूचना जारी कराव्या लागल्या. या सूचनांनुसार एका वेळी एका दालनामध्ये दोन अधिकाऱ्यांपेक्षा जास्त अधिकारी उपस्थित असणार नाहीत. एका वेळी उपसचिवांच्या खालच्या दर्जाच्या श्रेणीतील कर्मचारी आणि अधिकारी ३० पेक्षा जास्त उपस्थित असणार नाहीत, अशी माहिती 'ईटीव्ही भारत'ला मिळाली आहे.
मंगळवारी निर्गुंतवणूक सचिव तुहिन कांत पांडे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. सचिव दर्ज्याच्या अधिकाऱ्यांमध्ये पॉझिटिव्ह असलेले ते दुसरे अधिकारी होते. गेल्या आठवड्यात संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्ते के एस धतवालिया यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.
‘सरकारी कार्यालयात दिवसेंदिवस अधिकारी पॉझिटिव्ह बनण्याचे प्रमाण वाढत आहे. अधिकारी सुरक्षित राहावेत म्हणून खूप काळजी घेणे गरजेचे आहे,’ वस्त्रोद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे. ईटीव्ही भारतकडेती प्रत आहे.
याबद्दल माहिती असलेल्या संबंधित व्यक्तीकडून असे कळले की, एक-दोन दिवसात इतर मंत्रालयेही असे निर्देश काढण्याच्या तयारीत होती. या आदेशात असे म्हटले आहे की, एका दालनामध्ये दोनपेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित असता कामा नये. शिवाय खाजगी टॅक्सी, तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणार्या कर्मचार्यांना किंवा कंटेन्मेंट झोनजवळ किंवा त्या जवळ राहणाऱ्यांना कार्यालयात यायला प्रतिबंध करावा.
मंगळवारी डीआयपीएएमचे सचिव तुहिन कांत पांडे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी सगळीकडे गेल्यामुळे तातडीने ही पावले उचलली गेली.
डीआयपीएएम कर्मचाऱ्यांना इमारत निर्जंतुक करण्यासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली गेली. शिवाय निर्गुंतवणूक सचिवांसह दोन अधिकाऱ्यांची टेस्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली.
सरकारी वर्तुळात धोक्याची घंटा वाजू लागली आहे. तुहिन कांत पांडे हे काही एकमेव नाहीत. त्यांच्याबरोबर संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि पीआयबी मुख्य के. एस. धतवालिया यांच्या व्यतिरिक्त, अलिकडच्या काळात वित्त मंत्रालयाच्या अवर सचिव रीटा माल आणि कायदा-सुव्यवस्था मंत्रालयाचे सहसचिव डॉ. नारायणराव बट्टू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.
केंद्र सरकारच्या प्रसिद्धी महासंचालनालयाचे प्रधान महासंचालक म्हणून धतवालिया कोविडविषयी माहिती देण्याच्या प्रश्नोत्तरावेळी उपस्थित असायचे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्तपणे कोविडविषयी माहिती देण्याच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.
याबद्दल ज्यांना माहिती आहे, त्यांनी सांगितले की, के. एस. धतवालिया यांचा ड्रायव्हर आणि अजून एक कर्मचारीही पॉझिटिव्ह निघाला. शिवाय त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्वत:ला क्वारन्टाइन केले.
केंद्र सरकारच्या प्रसिद्धी शाखेचे प्रमुख म्हणून के. एस. धतवालिया हे केंद्रीय मंत्री आणि महत्त्वाच्या मंत्रालयांच्या इतर उच्च अधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात होते. त्यामुळेच आता काळजी वाढली आहे.
के.एस. धतवालिया यांनी सोमवारी (१ जून) आणि बुधवारी (३ जून) दोन मंत्रिमंडळांबद्दलची संक्षिप्त माहिती देण्यासाठी मीटिंग घेतली होती. यावेळी त्यांचा माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी, कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याशी संपर्क आला.
मंगळवारी धतवालिया यांनी संचार व आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांची आणखी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. ज्यात नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, सचिव संचार व आयटी संजय धोत्रे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही या मंत्र्यांनी हजेरी लावली होती. त्यांनी अत्याधुनिक सेवा कायद्यातील दूरगामी दुरुस्त्या मंजूर केल्या आणि दोन अध्यादेशांना मंजुरी दिली आणि देशातील शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन बाजारपेठेत विकण्याचे स्वातंत्र्य मिळवून दिले.
धतवालिया यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर किती केंद्रीय मंत्र्यांनी स्वत:ला विलीगीकरणात ठेवले, हे अजून नीट कळले नाही. पीआयबी इमारत मात्र, निर्जंतुकीकरणासाठी सील केली आहे. आणि नेहमी होणारी मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी झाली नाही.
पीआयबी उच्च अधिकाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालय मिळून नियमित कोविडबद्दल माहिती देते. ती पत्रकार परिषदही झाली नाही.
तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, गृह मंत्रालयाचे सहसचिव पुण्य सालिया श्रीवास्तव आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे साथीचे व संसर्गजन्य रोग प्रमुख रमन आर गंगाखेडकर यांनी स्वत:ला क्वारन्टाइन केले आहे की नाही, हे अजून स्पष्ट झाले नाही. हे अधिकारी नियमित दिल्लीच्या मीडिया सेंटरमध्ये के. एस. धतवालिया यांच्याबरोबर कोविडसंबंधी माहिती मीडियाला देत असत.
शिवाय गेल्या आठवड्यात संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर किती संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:ला विलीगीकरणात ठेवले आहे, हेही अजून कळले नाही.
संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार हे सर्वात वरिष्ठ असल्यामुळे ते नियमित संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सरसेनाप्रमुख बिपिन रावत आणि तिन्ही सेवा प्रमुखांशी संपर्कात होते.
पीटीआयच्या वृत्तानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दुसर्या दिवशी कार्यालयात हजर राहिले नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अजय कुमार यांच्या निकट संपर्कात असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार स्वत: ला अलग ठेवले होते, परंतु त्यांच्यात कोणताही सर्वोच्च लष्करी अधिकारी होता की नाही याची माहिती दिली गेली नाही.
राज्याचे नेते आणि अधिकारीही कोविडपासून सुरक्षित नाहीत
केंद्र सरकार व्यतिरिक्त, या संसर्गजन्य विषाणूचा परिणाम राज्यांवरही झाला आहे.
ज्या कोरोनाने देशात ८ हजार आणि जगभरात ४,१९,००० लोकांचा आतापर्यंत बळी घेतलाय त्याने बुधवारी डीएमकेचे आमदार जे अंबाजगन यांच्यावरही घाला घातला. कोविडने मृत्यू पावलेले ते देशातले पहिले आमदार ठरले.
गेल्या आठवड्यात, उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज, त्यांची पत्नी अमृता रावत आणि त्यांच्या कुटुंबातील २१ सदस्य, त्यात दोन मुले व त्यांच्या बायका आणि दीड वर्षांचा नातू, कर्मचारी हे कोव्हिड पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांनी स्वत:ला क्वारन्टाइन केले.
सतपाल महाराज २ मे रोजी (शुक्रवारी) मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेले होते.
सतपाल महाराज यांची पत्नी अमृता रावत शनिवारी ( मे ३०) पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. दुसऱ्या कोरोना चाचणीत कुटुंबाचे सदस्य आणि मंत्रीही पॉझिटिव्ह निघाले. ती संख्या २० पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ जवळच्या संपर्कातल्या लोकांना कोरोनाचा संसर्ग खूप जलद होतो.
अशाच प्रकारे गेल्या महिन्यात कोरोना विषाणूने गुजरात सरकारलाही घाबरवले. काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला यांच्याशी बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री विजय रुपानी यांना स्वत:ला विलग ठेवावे लागले. कारण खेडावाला यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.