ETV Bharat / bharat

मनोहर पर्रिकरांची प्रकृती अस्थिर; मुख्यमंत्री बदलाच्या घडामोडींना वेग - Loksabha 2019

मुख्यमंत्री पर्रिकर यांना अन्नाशयाचा कर्करोग झाला आहे. ६३ वर्षीय पर्रिकर यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा दिसत नसल्यामुळे गोव्याच्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये त्यांच्या दाखल करण्यात आले आहे.

मनोहर पर्रिकर (संग्रहित फोटो)
author img

By

Published : Mar 17, 2019, 1:12 PM IST

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर गोव्यातील मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत शनिवारी रात्री अचानक बिघडली होती. त्यामुळे सध्या त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे, असे सुत्रांचे म्हणणे आहे. तर, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत दिल्लीला रवाना झाले आहेत. यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड होणार, या चर्चांना वेग आला आहे.

मुख्यमंत्री पर्रिकर यांना अन्नाशयाचा कर्करोग झाला आहे. ६३ वर्षीय पर्रिकर यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गोव्यातील निवासस्थानी पर्रिकरांवर उपचार झाले. मात्र, प्रकृतीत सुधारणा दिसत नसल्यामुळे गोव्याच्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये त्यांच्या दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खराब झाली होती. त्यामुळे त्यांना अती दक्षतेत ठेवण्यात आले आहे.

पर्रिकरांची प्रकृती नाजूक आहे. दिवसेंदिवस ती ढासळत चालली आहे. यावर पक्ष लवकरच काही निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे भाजप नेते दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी निवडणूक समितीची ही बैठक आहे. लोकसभेचे दोन आणि विधानसभा पोटनिवडणुकीतील तीन उमेदवार निश्चित करून केंद्रीय कार्यकारिणीला यादी पाठवली जाणार आहे.
कालची बैठक ही विधीमंडळ गटाची होती. राज्यातील राजकीय घडामोडीवर चर्चा करण्यात आली. .
डॉ. प्रमोद सावंत, सभापती गोवा विधानसभा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.