ETV Bharat / bharat

समाजाची चिंताजनक स्थिती हे अर्थव्यवस्था ढासळण्याचे मूलभूत कारण - मनमोहन सिंग - fundamental reason of worrisome state of economy

सिंग यांनी आज जाहीर झालेली जीडीपीची आकडेवारी अत्यंत अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. 'आज जाहीर झालेली जीडीपीची आकडेवारी सर्वांत कमी म्हणजे ४.५ टक्के आहे. हे अतिशय अनपेक्षित आहे. आपल्या देशाचा वार्षिक जीडीपी ८ ते ९ टक्क्यांवर असायलाच हवा होता,' असे ते म्हणाले.

मनमोहन सिंग
मनमोहन सिंग
author img

By

Published : Nov 29, 2019, 9:32 PM IST

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत असल्याचे म्हटले आहे. शिवाय, समाजाची स्थितीही चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेची ढासळलेली स्थिती हे यामागचे मूलभूत कारण आहे, असे ते म्हणाले. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

सिंग यांनी आज जाहीर झालेली जीडीपीची आकडेवारी अत्यंत अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. 'आज जाहीर झालेली जीडीपीची आकडेवारी सर्वांत कमी म्हणजे ४.५ टक्के आहे. हे अतिशय अनपेक्षित आहे. आपल्या देशाचा वार्षिक जीडीपी ८ ते ९ टक्क्यांवर असायलाच हवा होता,' असे ते म्हणाले.

'जीडीपीच्या दरात वार्षिक ५ टक्क्यांनी घट होणे हे अर्थव्यवस्थेची मोठी हानी झाल्याचे निदर्शक आहे. त्यामुळे आर्थिक धोरणांमध्ये नुसते लहान-सहान बदल होण्याने अर्थव्यवस्थेत पुन्हा 'जान' येणार नाही,' असे सिंग म्हणाले. त्यासाठी समाजातील सध्याचे वातावरणच बदलणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

  • Former PM Manmohan Singh: We need to change current climate in our society from one of fear to one of confidence for our economy to start growing at 8%/annum. State of economy is a reflection of state of its society. Our social fabric of trust & confidence is now torn & ruptured. pic.twitter.com/DtZDO7o7Mh

    — ANI (@ANI) November 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'आपल्याला सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी असलेले चिंतेचे वातावरण बदलून आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. तरच देशाची अर्थव्यवस्थेत वार्षिक आठ टक्क्यांनी वाढ होईल. देशाची अर्थव्यवस्था हे देशातील समाजाचेच प्रतिबिंब असते. सध्या समाजातील विश्वासाला तडा गेलेला आहे,' असे सिंग यांनी म्हटले.

भारताच्या अर्थव्यवस्थेतील वाढ जुलै ते सप्टेंबर या तिमाही काळात (क्वार्टर) ४.५ टक्क्यांवर आली आहे. याआधी ती ७.१ टक्क्यांवर होती. तथापि, मुख्य अर्थ सल्लागार (सीईए) के. व्ही. सुब्रमण्यम यांनी देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होण्याची आशा व्यक्त केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही काळामध्ये ती होईल, असे त्यांनी म्हटले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत होत आहे. जीडीपी पुढील तिमाहीच्या काळात उंचावेल, असेही ते म्हणाले.

आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अतानू चक्रवर्ती यांनी भागभांडवल सकारात्मक दिशेने निघाले असल्याचे म्हटले आहे.

Intro:Body:

समाजाची चिंताजनक स्थिती हे अर्थव्यवस्था ढासळण्याचे मूलभूत कारण - मनमोहन सिंग

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत असल्याचे म्हटले आहे. शिवाय, समाजाची स्थितीही चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेची ढासळलेली स्थिती हे यामागचे मूलभूत कारण आहे, असे ते म्हणाले. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

सिंग यांनी आज जाहीर झालेली जीडीपीची आकडेवारी अत्यंत अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. 'आज जाहीर झालेली जीडीपीची आकडेवारी सर्वांत कमी म्हणजे ४.५ टक्के आहे. हे अतिशय अनपेक्षित आहे. आपल्या देशाचा वार्षिक जीडीपी ८ ते ९ टक्क्यांवर असायलाच हवा होता,' असे ते म्हणाले.

'जीडीपीच्या दरात वार्षिक ५ टक्क्यांनी घट होणे हे अर्थव्यवस्थेची मोठी हानी झाल्याचे निदर्शक आहे. त्यामुळे आर्थिक धोरणांमध्ये नुसते लहान-सहान बदल  होण्याने अर्थव्यवस्थेत पुन्हा जान येणार नाही,' असे सिंग म्हणाले. त्यासाठी समाजातील सध्याचे वातावरणच बदलणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

'आपल्याला सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी असलेले चिंतेचे वातावरण बदलून आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. तरच देशाची अर्थव्यवस्थेत वार्षिक आठ टक्क्यांनी वाढ होईल. देशाची अर्थव्यवस्था हे देशातील समाजाचेच प्रतिबिंब असते. सध्या समाजातील विश्वासाला तडा गेलेला आहे,' असे सिंग यांनी म्हटले.

भारताच्या अर्थव्यवस्थेतील वाढ जुलै ते सप्टेंबर या तिमाही काळात (क्वार्टर) ४.५ टक्क्यांवर आली आहे. याआधी ती ७.१ टक्क्यांवर होती. तथापि, मुख्य अर्थ सल्लागार (सीईए) के. व्ही. सुब्रमण्यम यांनी देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होण्याची आशा व्यक्त केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही काळामध्ये ती होईल, असे त्यांनी म्हटले आहे. भारताच्या अर्थ्व्यवस्थेचा पाया मजबूत होत आहे. जीडीपी पुढील तिमाहीच्या काळात उंचावेल, असेही ते म्हणाले.

आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अतानू चक्रवर्ती यांनी भागभांडवल सकारात्मक दिशेने निघाले असल्याचे म्हटले आहे.

-----------------

third quarter of financial year

unexpectable

aspiration

reflection

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.