ETV Bharat / bharat

...म्हणून 'आप'ने सीसीटीव्हीमध्ये कैद गृहमंत्र्याचे फूटेज केले जारी - Amit Shah in Delhi CCTV Cameras

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

मनिष सिसोदिया
मनिष सिसोदिया
author img

By

Published : Jan 8, 2020, 8:00 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे वचन केजरीवाल सरकारने पुर्ण केले नाही, अशी टीका शाह यांनी केली होती. त्यावर सिसोदिया यांनी अमित शाह यांच्या प्रचाराचे सीसीटीव्ही फूटेज जारी केले. हे फुटेज जारी करुन उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

Manish Sisodia Hits Out At Amit Shah Over Delhi CCTV Cameras
'आप'ने सीसीटीव्हीमध्ये कैद गृहमंत्र्याचे फूटेज केले जारी
'मी अमित शाह यांचे पूर्ण भाषण ऐकले असून त्यांनी १५ लाख सीसीटीव्ही कॅमेऱयावरून दिल्ली सरकारवर टीका केली. त्यांना मी सांगू इच्छितो की, गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही लाजपत नगरमधील गल्लीमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला. त्या गल्लीमध्ये 16 सीसीटीव्ही कॅमरे लावलेले आहेत. त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही प्रचार करताना पाहायला मिळाले आहात. तसेच प्रचारादरम्यान कोणती लोक तुमच्याशी चर्चा करत आहेत आणि कोणती दरवाजा ही उघडत नाहीत. हेही दिल्ली सरकारच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे, असा टोला सिसोदिया यांनी लगावला.
भाजपने प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख टाकण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे 15 लाखांचा जुमला भाजपाच्या जीवनाशी जोडला गेला आहे. म्हणून त्यांना प्रत्येक गोष्टीत फक्त 15 लाखच दिसत आहेत. भाजपसाठी त्याचा जाहिरनामा एक जुमला आहे. मात्र आमच्यासाठी आमचा जाहीरनामा हा गीता, बायबल आणि कुरान असून आम्ही आमचे प्रत्येक आश्वासन पूर्ण केले आहे, असे सिसोदिया म्हणाले.
गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी दिल्लीमध्ये नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. गेल्या 5 वर्षांमध्ये केजरीवाल सरकारने काहीच काम केलं नसल्याचे शाह म्हणाले. केजरीवाल यांनी १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे वचन दिले होते. मात्र, त्यांनी आपले आश्वासन पूर्ण केले नाही, अशी टीका शाह यांनी केली होती.

Intro:Body:

...म्हणून 'आप'ने सीसीटीव्हीमध्ये कैद गृहमंत्र्याचे फूटेज केले जारी

नवी दिल्ली - उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीमध्ये १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे वचन केजरीवाल सरकारने पुर्ण केले नाही, अशी टीका शाह यांनी केली होती. त्यावर सिसोदिया यांनी अमित शाह यांच्या प्रचाराचे सीसीटीव्ही फूटेज जारी केले असून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

मी अमित शाह यांचे पूर्ण भाषण ऐकले असून त्यांनी १५ लाख सीसीटीव्ही कॅमेऱयावरून दिल्ली सरकारवर टीका केली. त्यांना मी सांगू इच्छितो की, गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही लाजपत नगरमधील गल्लीमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला.  त्या गल्लीमध्ये 16 सीसीटीव्ही कॅमरे लावलेले आहेत. त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. तसेच प्रचारादरम्यान कोणती लोक तुमच्याशी चर्चा करत आहेत आणि कोणती दरवाजा ही उघडत नाहीत. हेही दिल्ली सरकारच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे, असा टोला सिसोदिया यांनी लगावला.

भाजपने प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख टाकण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे 15 लाखांचा जुमला भाजपाच्या जीवनाशी जोडला गेला आहे. म्हणून त्यांना प्रत्येक गोष्टीत फक्त 15 लाखच दिसत आहेत. भाजपसाठी त्याचा जाहिरनामा एक जुमला आहे. मात्र आमच्यासाठी आमचा जाहीरनामा हा गीता, बायबल आणि कुरान असून आम्ही आमचे प्रत्येक आश्वासन पूर्ण केले आहे, असे सिसोदिया म्हणाले.

गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी दिल्लीमध्ये नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. गेल्या 5 वर्षांमध्ये केजरीवाल सरकारने काहीच काम केलं नसल्याचे शाह म्हणाले. केजरीवाल यांनी १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे वचन दिले होते. मात्र, त्यांनी आपले आश्वासन पूर्ण केले नाही, अशी टीका शाह यांनी केली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.