शिमला - आपण गाडी, ट्रकच्या मागे लिहीलेले स्लोगन वाचलेच असणार. ही वाक्ये फारच रोचक असतात तर त्यातील काही वाक्ये ही तथ्यपुर्णही असतात. अशाच प्रकारच्या नाना स्लोगन, वाक्यांनी सोशल मिडीया दिवसभर गजबजलेला असतो. कधी हे स्लोगन खुपच हास्यास्पद असतात तर कधी यात तर्कही असतात. असेच एक वाक्य(स्लोगन) हमीरपुरच्या कँटीन मध्येही लिहीले आहे. असे काय विशेष आहे या वाक्यात चला जाणून घेउया....
हमीरपुर येथील एका कँटीनमध्ये 'जोपर्यंत अनाधिकृत काश्मीरचा मुद्दा सुटत नाही तोपर्यंत उधार बंद आहे' अशी ओळ लिहीली आहे. हे वाचताच आपल्याही चेहऱ्यावर हसु येईल एवढच नव्हे तर हे वाक्य आपल्याला विचार करायलाही भाग पाडते.
पहिल्यांदा हे वाक्य वाचताना आपल्याला वाटेल कि, उधारी न देण्याबद्दलचा चांगला बहाणा करत हे वाक्य लिहीले गेले असेल पण, थांबा! हे वाक्य लिहीणाऱ्या व्यक्तिला भेटताच आपला हा विचार बदलुन जाईल.
या कँटीनचे संचालक अनुज यांनी सांगितले कि, त्याला सेनेत भर्ती व्हायचे होते पण काही कारणामुळे त्याला ही संधी मिळु शकली नाही. मात्र, त्याचा लहान भाऊ भारतीय सेनेत असुन देशाच्या सीमेवर तैनात आहे. तर, देशभक्तीच्या भावनेने मी हे वाक्य भींतीवर लिहीले असे अनुजचे म्हणणे आहे.
आपण आजच्या तरुण पिढीला आधुनिकतेच्या नावाखाली विविध व्यसनांच्या, नशेच्या आहारी जाताना बघत आहोत. पण, देशात काही तरुण असेही आहेत जे देशहितासाठी दिवसंरात्र विचार करताना दिसतात. अनुजने लिहीलेल्या भींतीवरील या ओळीसुद्धा समाजाला एकप्रकारचा संदेश देत असून क्षणभरासाठी का होईना पण, काश्मीर मुद्द्य़ाचा विचार करायला भाग पाडतात.