बांकुरा (पश्चिम बंगाल) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्यावर कोलमाफिया असल्याचे आरोप केले होते. हे खोटे निघाल्यास तुम्हाला जनतेसमोर १०० उठाबशा काढाव्या लागतील, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले.
ममता बॅनर्जी या बंगालमधील बनकुरा येथे बोलत होत्या. त्या म्हणाल्या मी नरेंद्र मोदी यांना आव्हान देते. त्यांनी आमच्यावर केलेले कोल माफियाचे आरोप सिध्द करावेत. आम्ही आमचे ४२ उमेदवार मागे घेऊ. जर मोदी खोटे बोलत असतील तर त्यांनी जनतेसमोर १०० उठाबशा काढाव्या, असे वक्तव्य बॅनर्जी यांनी केले.