नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट चांगली झाल्याचे त्यांनी नंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
-
West Bengal CM Mamata Banerjee in Delhi: The meeting with Prime Minister was good. We discussed changing the name of West Bengal to 'Bangla'. He has promised to do something about the matter. pic.twitter.com/pujLHoooev
— ANI (@ANI) September 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">West Bengal CM Mamata Banerjee in Delhi: The meeting with Prime Minister was good. We discussed changing the name of West Bengal to 'Bangla'. He has promised to do something about the matter. pic.twitter.com/pujLHoooev
— ANI (@ANI) September 18, 2019West Bengal CM Mamata Banerjee in Delhi: The meeting with Prime Minister was good. We discussed changing the name of West Bengal to 'Bangla'. He has promised to do something about the matter. pic.twitter.com/pujLHoooev
— ANI (@ANI) September 18, 2019
हेही वाचा : अयोध्या प्रकरणाची सुनावणी १८ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी - सरन्यायाधीश
पंतप्रधानांसोबत झालेली भेट ही केवळ सौजन्य म्हणून असल्याचे ममता बॅनर्जींनी स्पष्ट केले. तसेच, आपण पश्चिम बंगालशी संबंधीत प्रश्नांवर आणि समस्यांवर चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये, केंद्राकडून मिळणारे पेन्शन फंड, तसेच राज्याचे नाव बदलणे अशा प्रश्नांचा समावेश होता हेही त्यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदींवर कठोर टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी यांचाही समावेश होतो. त्यामुळे त्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालमधील वातावरण चांगलेच तापले आहे.
हेही वाचा : ई-सिगारेटवर बंदी, उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि तुरुंगवासाची तरतूद