कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील जनतेने कोरोना आणि अम्फान चक्रीवादळ या दोन्ही संकटांना समर्थपणे तोंड दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले, तर या बिकट काळातही विरोधकांचे आरोप सुरूच होते असे त्या म्हणाल्या.
जागतिक साथीचा रोग आणि वादळ या दुहेरी संकटाला आपण कसे सामोरे गेलो. त्यामधून बंगाल अधिक सामर्थ्यवान आणि एकसंध होईल. बंगालमधील लोकांची संस्कृती आणि दुर्दम्य सामर्थ्य यांचे विशेष कौतुक आहे. या कठीण काळात लढत असलेल्या, नेतृत्व करणाऱ्या सर्वांचे बॅनर्जी यांनी आभार मानले. पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने मी सर्व मदत कर्मचारी, पोलीस, वैद्यकीय सेवा देणारे आणि नागरी संस्था यांचे आभार मानू इच्छिते. या संकटांवर मात करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तरीही इथून पुढेही आपण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करा आणि आपल्या स्व:तची पूर्ण काळजी घ्या. बसेसमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी जास्त गर्दी टाळा, खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी जास्तीत जास्त घरातून काम कसे चालेल, याकडे लक्ष द्यावे. नेहमी मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, असे त्या ट्विटरवरून म्हणाल्या.
विरोधी पक्षांवर विशेषत: भाजपवर त्यांनी टीका केली. चक्रीवादळ काळात केंद्राकडून मदत सामुग्रीचे अपुरे आणि अयोग्य वितरण झाले.