ETV Bharat / bharat

वादग्रस्त ट्विट प्रकरणी निधी चौधरींची उचलबांगडी; तत्पूर्वी राज्य सरकारने स्पष्टीकरणही मागवले - आयएएस

आयएएस अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधीविरोधात वादग्रस्त ट्वीट केले होते. राज्य सरकारने याप्रकरणी त्यांना याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. याबरोबरच मुंबई महानगरपालिकेतून त्यांची बदली राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात करण्यात आली आहे.

आएएस निधी चौधरी
author img

By

Published : Jun 3, 2019, 5:21 PM IST

Updated : Jun 3, 2019, 8:23 PM IST

मुंबई - आयएएस अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधीविरोधात वादग्रस्त ट्वीट केले होते. याप्रकरणी राजकीय पक्षांकडून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत होती. आज राज्य सरकारने याप्रकरणी निधी चौधरी यांना याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. याबरोबरच मुंबई महानगरपालिकेतून त्यांची बदली राज्याच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयात करण्यात आली आहे.

गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

निधी चौधरी यांनी ट्वीट करताना लिहिले होते, यावर्षी १५० व्या जयंतीनिमित्त विशेष जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. आपण भारतीय चलनावर असलेल्या त्यांचा चेहरा काढला पाहिजे. देशात आणि जगभरात महात्मा गांधीचे जिथे-जिथे पुतळे आहेत किंवा विविध ठिकाणी देण्यात आलेली त्यांची नावे काढली पाहिजेत. आमच्याकडून हीच खरी श्रद्धांजली ठरेल! ३०.०१.१९४८ साठी धन्यवाद #गोडसे.

nidhi choudhary tweet
निधी चौधरी यांचे वादग्रस्त ट्वीट

निधी चौधरी सध्या मुंबई महानगरपालिकत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्या आयएएस २०१२ सालच्या तुकडीतील अधिकारी आहेत. निधींच्या वादग्रस्त ट्वीटबद्दल महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेने मुख्य सचिवाना पत्र लिहित त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. निधी चौधरींच्या या वादग्रस्त ट्वीटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 3, 2019, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.