नवी दिल्ली - मनसे प्रमूख राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. तोंडावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट खूप महत्वपूर्ण आहे.
-
Delhi: Maharashtra Navnirman Sena(MNS) Chief Raj Thackeray met UPA Chairperson Sonia Gandhi today pic.twitter.com/k8IpgPAX8u
— ANI (@ANI) July 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: Maharashtra Navnirman Sena(MNS) Chief Raj Thackeray met UPA Chairperson Sonia Gandhi today pic.twitter.com/k8IpgPAX8u
— ANI (@ANI) July 8, 2019Delhi: Maharashtra Navnirman Sena(MNS) Chief Raj Thackeray met UPA Chairperson Sonia Gandhi today pic.twitter.com/k8IpgPAX8u
— ANI (@ANI) July 8, 2019
राज ठाकरेंनी सकाळी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता असल्यानं आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा असल्याचे ही ते म्हणाले आहेत.
राज ठाकरे यांनी जाहीर सभांमधून मोदींच्या भाषणाचे जुने व्हिडिओ आणि प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली होती. त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे वाक्य देखील खुप गाजले होते. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र प्रत्यक्ष निकालांमध्ये त्याचा फारसा परिणाम दिसून आला नव्हता.