ETV Bharat / bharat

भीलवाडामध्ये 14 एप्रिलपर्यंत महाकर्फ्यू लागू, लोकांनी घरामध्येच राहण्याचे पोलिसांकडून आवाहन

कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. राजस्थानमधील भीलवाडा शहरामध्ये येत्या 14 एप्रिलपर्यंत महाकर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

author img

By

Published : Apr 3, 2020, 1:34 PM IST

'Maha curfew' in Bhilwara from today to April 13, ban on entry of media too

भीलवाडा - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. राजस्थानमधील भीलवाडा शहरामध्ये येत्या 14 एप्रिलपर्यंत महाकर्फ्यू लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे पूर्णपणे पालन व्हावे, यासाठी शहरातील 3 हजार पोलीस कर्मचारी तैनात आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस रॅली काढून जनजागृती करत आहेत.

भीलवाडामध्ये 14 एप्रिलपर्यंत महाकर्फ्यू लागू, लोकांनी घरामध्येच राहण्याचे पोलिसांकडून आवाहन

भीलवाडामध्ये सध्या 26 जण कोरोनाबाधित होते. सर्वांना निरक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यातील 13 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच गेल्या 3 दिवसांपासून एकही कोरोनाबाधित आढळला नाही. येणारे 10 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये आणि प्रशासन, डॉक्टर, यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट यांनी केले आहे.

दरम्यान देशामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी देशातील रुग्णांच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. काल दिवसभरामध्ये महाराष्ट्रात ८१, तर तामिळनाडू मध्ये ७५ नवे रुग्ण आढळून आले. देशात सध्या कोरोनाचे एकूण २,३०१ रुग्ण आहेत. यांपैकी २,०८८ रुग्ण हे अ‌ॅक्टिव आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.