ETV Bharat / bharat

धक्कादायक ! जय श्री राम न म्हटल्यामुळे मदरशामधील मुलांना मारहाण - Jai Sri Ram

जय श्री राम न म्हटल्यामुळे जमावाने मदरशामधील मुलांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक! जय श्री राम न म्हटल्यामुळे मदरशामधील मुलांना मारहाण
author img

By

Published : Jul 13, 2019, 7:07 PM IST

Updated : Jul 13, 2019, 7:23 PM IST

उन्नाव - जय श्री राम न म्हटल्यामुळे जमावाने मदरशामधील मुलांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती उन्नाव पोलिसांनी दिली आहे.

मदरशातील मुले मैदानात क्रिकेट खेळत होती. यावेळी चार युवक आले. त्यांना जय श्री राम म्हण्यास सांगितले. नकार दिल्यानंतर त्यांनी मदराशातील मुलांना मारहाण केली. या मारहाणीत अनेक मुलं जखमी झाली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

यापुर्वी उत्तर प्रदेशातील कानपूर येथील बर्रा भागात एका मुस्लीम युवकाला जय श्री राम न म्हटल्यामुळे काही लोकांनी मारहाण केली होती. तर तबरेज या २४ वर्षीय तरुणाला एका खांबाला बांधण्यात आले होते. जय श्रीराम म्हणण्याची सक्ती करण्यात आली होती.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मराठी प्रतिक्रिया
Last Updated : Jul 13, 2019, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.