भोपाळ - मध्यप्रदेश राज्यातील रेवा जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि बसमध्ये जोरदार टक्कर झाली असून या अपघातमध्ये तब्बल 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. 30 जण जखमी झाले असून त्यांना संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.
स्थानिक नागरिकांना या अपघाताचा दोष प्रशासनाला दिला आहे. या रस्त्यावर एकही गतीरोधक नसल्यामुळे नसल्यामुळे गाड्याचा वेग जास्त असतो. यापूर्वीदेखील येथे अनेक अपघात झाले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.