सागर - मध्य प्रदेश राज्यामध्ये ओबीसींना देण्यात येणारे आरक्षण १४ टक्क्यांवरुन वाढवून आता २७ टक्के देण्यात येणार आहे. यासोबतच राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना १० टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केली.
सागर येथे जय किसान शेती कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करताना एका सभेत ते बोलत होते. सर्व वर्गांची प्रगती व्हावी यासाठी मध्य प्रदेशचे शासन कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.