नवी दिल्ली - सेक्युलॅरिझमचा हा जो सुरमा आहे, त्या औवेसींनी देशातील अल्पसंख्यांकांना विशेषकरुन मुस्लिमांना हिस्सेदार नाही तर भाडेकरू बनवून ठेवले होते. तर मोदींनी देशाच्या १३० कोटी जनतेला विकासाचे भागीदार बनवले असल्याचे सांगत अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी औवेसींच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
मुस्लिमांनी भाजप सत्तेत आले म्हणून घाबरण्याचे काम नाही. आम्ही भारताचे नागरिक आहोत. भारत स्वतंत्र आहे आणि त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशिल राहू. आम्ही भारतात भाडेकरू नाही तर बरोबरीचे हिस्सेदार म्हणून राहत आहोत, असे वक्तव्य एमआयएमचे खासदार औवेसींच्या यांनी केले होते.
लोकसभेत ३०० जागा मिळाल्या म्हणून वाट्टेल ते करू, असे जर पंतप्रधानांना वाटत असेल तर ते शक्य नाही. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही तुमच्यासोबत लढत राहू, असा इशारा एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदींना दिला होता. संविधानाने प्रत्येक धर्माला आपले धार्मिक स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार दिला आहे. त्या अधिकारांसाठी असदुद्दीन औवेसी सतत लढत राहील, असेही ते म्हणाले होते.