नवी दिल्ली - दिल्लीला सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीमध्ये हा दुसरा भूकंप झाला आहे. सुदैवाने यामुळे कोणतेही नुकसान वा जीवीतहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही.
आज झालेल्या भुकंपाचे केंद्रस्थान हे ईशान्य दिल्लीच्या वझीरपूरमध्ये, जमीनीखाली पाच किलोमीटरवर होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.७ मॅग्निट्यूड होती. राष्ट्रीय भूंकपशास्त्र केंद्राचे प्रमुख जे. एल. गौतम यांनी ही माहिती दिली.
-
Earthquake with magnitude 2.7 hits Delhi
— Press Trust of India (@PTI_News) April 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Earthquake with magnitude 2.7 hits Delhi
— Press Trust of India (@PTI_News) April 13, 2020Earthquake with magnitude 2.7 hits Delhi
— Press Trust of India (@PTI_News) April 13, 2020
दरम्यान, रविवारीही दिल्लीला भुकंपाचा सौम्य झटका बसला होता. ३.५ रिश्टर स्केल मॅग्निट्यूडचा हा भूकंप होता. भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. या भुकंपाचे केंद्र जमीनीखाली आठ किलोमीटर होते.
हेही वाचा : COVID-19 : ७० वर्षांच्या आजीची कोरोनावर मात; मंगळुरूतील रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज..