दिल्ली - राजधानीत 28 व्या पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक पुस्तक खरेदीसाठी येत आहेत. कॉंगेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनीही या प्रदर्शनाला भेट दिली.
हेही वाचा- 'बँक शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर सरकार गंभीर निर्णय घेईल'
राजीव शुक्ला यांनी यावेळी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले, की मी प्रत्येक वर्षी या प्रदर्शनाला भेट देतो. पुस्तक वाचकांसाठी हे प्रदर्शन फायद्याचे ठरते. येथे आपल्या आवडीनुसार पुस्तके मिळतात. पुस्तक वाचनाचा छंद असणे चांगले आहे. पुस्तकाने आपले वर्तमान, भविष्य बदलले जाऊ शकते. प्रदर्शनात तरुणांची संख्या मोठी दिसून येत आहे. त्यातून हे स्पष्ट होते की, डिजिटल माध्यम असूनही, तरुणांमधील पुस्तकांबद्दल अजूनही प्रेम आहे.