ETV Bharat / bharat

43 दिवसांची प्रतीक्षा...तेलंगाणात दारूच्या दुकानाबाहेर मद्यपींच्या लांबच लांब रांगा - दारुविक्रीची दुकाने

तेलंगाणा राज्यात 43 दिवसांनंतर सुरु झालेल्या दारुच्या दुकानाबाहेर मद्यपींनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र होते. 33 जिल्ह्यातील 2 हजार दारुविक्रीची दुकाने आज सुरु झाली.

Breaking News
author img

By

Published : May 6, 2020, 2:03 PM IST

हैदराबाद- तेलंगाणा राज्यात 43 दिवसांनंतर सुरु झालेल्या दारुच्या दुकानाबाहेर मद्यपींनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र होते. 33 जिल्ह्यातील 2 हजार दारुविक्रीची दुकाने आज सुरु झाल्यानंतर मद्यपींनी दुकानाबाहेर मोठ्या रांगा लावल्या.

तेलंगाणा सरकारने राज्यातील कटेंनमेंट झोन वगळता सर्व ठिकाणी दारूची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. राज्यामध्ये 2216 दारुविक्रीची दुकाने आहेत.यापैकी 15 दुकाने कंटेनमेंट झोन मध्ये येत असल्याने ती बंद ठेवण्यात आली आहेत.

दारुच्या दरामध्ये 16 टक्क्यांनी दरवाढ होऊनही दारु पिणारांवर याचा काही परिणाम झालेला नाही. काही ठिकाणी दारुच्या नवीन किमती लागू करायच्या असल्याने काही ठिकाणी दुकाने उशिरा सुरु झाली.

मद्यविक्री सुरु करण्याचा निर्णय काल रात्री जाहीर केल्यापासून मला झोप लागली नाही. मी सकाळी दारु विकत घेण्यासाठी आलो, पण अगोदरच रांग लागली होती. दारु विक्रीला परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्याचे आभार मानतो, असे हैदराबादमधील कोटी येथील मद्यपीने व्यक्त केली. दारुविक्री दुकानाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत होते यावेळी नो मास्क नो लिकर धोरण राबवले गेले होते.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास दुकाने बंद करण्यात येतील असा इशारा दिला होता. दिल्ली,बेंगलुरु आणि इतर शहरांसारखी परिस्थिती खपवून घेतली जाणार नाही, असे म्हटले होते. दारुविक्रीची दुकाने सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहतील. तेलंगणारा राज्याला लागून असणाऱ्या सर्व राज्यांनी दारुविक्रीची दुकाने सुरु केल्याने हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.