ETV Bharat / bharat

'हिपॅटायटीस'चे उच्चाटन करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवणार - ओम बिर्ला - लोकसभा अध्यक्ष ओम बिरला

येत्या २८ जुलै म्हणजेच उद्या जागतिक हिपॅटायटीस दिवस आहे. त्यानिमित्त देशभरात शहर रुग्णालयाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हिपॅटायटीस 'बी' आणि हिपॅटायटीस 'सी' या रोगांचे उच्चाटन करणे गरजेचे असल्याचे बिर्ला म्हणाले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला
author img

By

Published : Jul 27, 2019, 11:30 PM IST

नवी दिल्ली - पोलिओचे देशातून उच्चाटन झालेले आहे. अगदी त्याचप्रमाणे हिपॅटिटीसचे उच्चाटन करणे गरजेचे आहे. त्यामुळे हिपॅटायटीसचा संसर्ग थांबवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले.

येत्या २८ जुलै म्हणजेच उद्या जागतिक हिपॅटायटीस दिवस आहे. त्यानिमित्त देशभरात शहर रुग्णालयाच्या माध्यमातून जनजागृती मोहमी राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हिपॅटायटीस 'बी' आणि हिपॅटायटीस 'सी' या रोगांचे उच्चाटन करणे गरजेचे असल्याचे बिरला म्हणाले.

सर्व खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात हा रोग, त्याची कारणे आणि त्यापासून बचावासाठी उपायोजना याबाबत जनजागृती करावी, असेही ते म्हणाले.

पोलिओबद्दल जनजागृती करून देशातून पोलिओचे उच्चाटन केले. त्याचप्रमाणे आपण हिपॅटायटीसचे उच्चाटन करू शकतो. त्यासाठी जनतेने पुढाकार घ्यायला पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले. तसेच अल्कोहोलमुळे होणाऱ्या रोगांना टाळण्यासाठी जनतेने लग्नात, सार्वजनिक कार्यक्रमात दारूसारखे पदार्थ ठेऊ नये, अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.