ETV Bharat / bharat

सपा-बसप आघाडीतून निषाद बाहेर, राजकारणात येण्याचा निर्णय योग्य वेळी घेणार उत्पल पर्रिकर - Live update

लोकसभा निवडणुकांना फारच कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील पक्ष संपूर्ण ताकदीनीशी निवडणुकीची तयारी करत आहेत. आज दिवसभरात राष्ट्रीय राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चांचा धावता आढावा...

मतकंदन
author img

By

Published : Mar 30, 2019, 3:31 PM IST

...तर निकालाला विलंब होईल; निवडणूक आयोगाचे न्यायालयात स्पष्टीकरण

व्हीव्हीपॅटमधील ५० टक्के निकाल ईव्हीएमसोबत तपासल्यास लोकसभा निवडणूक निकालाला ५ दिवसांचा विलंब होईल, असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनच्या निकालाची तुलना व्हावी, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. यावर उत्तर देताना निवडणूक आयोगाने हे स्पष्टिकरण दिले. सविस्तर वाचा..

सपा-बसप आघाडीतून 'निषाद' बाहेर; भाजपशी आघाडी करणार?

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. राजकारणाची हवेचा अंदाज घेऊन एकत्र आलेल्या बसप, समाजवादी पक्ष आणि इतर पक्षांच्या महाआघाडीला आता खिळ बसण्याची शक्यता आहे. या आघाडीतील निषाद पक्ष नाराज असून भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारणाला आता वेगळेच वळन आले आहे. सविस्तर वाचा..

राजकारणात येण्याचा निर्णय योग्य वेळी घेईन - उत्पल पर्रिकर

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या चिरंजीवांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. मात्र, पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल यांनी आपण अद्याप असा कोणताही विचार केलेला नसून आपण लोकभावना समजून घेत असल्याचे सांगितले. सविस्तर वाचा..

लोकसभा निवडणूक : 'या' जागांवर असणार देशाचे लक्ष; दिग्गज मैदानात

लोकसभा निवडणुकांना मोजून ११ दिवस शिल्लक आहेत. संपूर्ण देशभरात या उत्सवाची तयारी शिगेला पोहोचली आहे. आपल्या मतदारसंघात सर्व मतदारांची नजर असेलच. मात्र, देशभरातील जनतेचे लक्ष देशातील काही मोठ्या जागांवर लागून राहणार आहे. या जागांवर देशातील दिग्गज नेते आपले आपले भाग्य आजमावणार आहेत. सविस्तर वाचा..

बडतर्फ जवान तेजबहादूर यादव मोदींविरोधात लढणार निवडणूक

सैनिकांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाला निलंबित केले होते. हाच जवान आता लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवणार आहे. तेजबहादूर यादव असे त्या जवानाचे नाव आहे. सविस्तर वाचा..

पंतप्रधान मोदींच्या 'त्या' भाषणाने आचारसंहितेचा भंग नाही

भारताने 'मिशन शक्ती' अंतर्गत उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची (ए-सॅट) यशस्वी चाचणी घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून दिली होती. या भाषणाने कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. सविस्तर वाचा..

सत्तेत आलो तर नीती आयोग बरखास्त करु - राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जर काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला तर नीती आयोग (NITI - नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया) बरखास्त करू, असे त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. नीती आयोगाने मोदी सरकारचे मार्केटिंग आणि आकड्यांमध्ये फेरफार करण्याशिवाय काहीही काम केलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. सविस्तर वाचा..

नरेंद्र मोदी १२ एप्रिलला प्रचारासाठी गोव्यात

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी १२ एप्रिलला भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ गोव्यात येणार आहेत. यावेळी ते प्रचारसभेला संबोधित करतील, असे गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही सभा उत्तर गोव्यात होणार असून अद्याप सभेची जागा निश्चित करण्यात आलेली नाही. सविस्तर वाचा..

Intro:Body:

सपा-बसप आघाडीतून निषाद बाहेर, राजकारणात येण्याचा निर्णय योग्य वेळी घेणार उत्पल पर्रिकर

लोकसभा निवडणुकांना फारच कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील पक्ष संपूर्ण ताकदीनीशी निवडणुकीची तयारी करत आहेत. आज दिवसभरात राष्ट्रीय राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चांचा धावता आढावा...

...तर निकालाला विलंब होईल; निवडणूक आयोगाचे न्यायालयात स्पष्टीकरण

व्हीव्हीपॅटमधील ५० टक्के निकाल ईव्हीएमसोबत तपासल्यास लोकसभा निवडणूक निकालाला ५ दिवसांचा विलंब होईल, असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनच्या निकालाची तुलना व्हावी, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. यावर उत्तर देताना निवडणूक आयोगाने हे स्पष्टिकरण दिले.

सपा-बसप आघाडीतून 'निषाद' बाहेर; भाजपशी आघाडी करणार?

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. राजकारणाची हवेचा अंदाज घेऊन एकत्र आलेल्या बसप, समाजवादी पक्ष आणि इतर पक्षांच्या महाआघाडीला आता खिळ बसण्याची शक्यता आहे. या आघाडीतील निषाद पक्ष नाराज असून भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारणाला आता वेगळेच वळन आले आहे .

राजकारणात येण्याचा निर्णय योग्य वेळी घेईन - उत्पल पर्रिकर

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या चिरंजीवांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. मात्र, पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल यांनी आपण अद्याप असा कोणताही विचार केलेला नसून आपण लोकभावना समजून घेत असल्याचे सांगितले.

लोकसभा निवडणूक : 'या' जागांवर असणार देशाचे लक्ष; दिग्गज मैदानात

लोकसभा निवडणुकांना मोजून ११ दिवस शिल्लक आहेत. संपूर्ण देशभरात या उत्सवाची तयारी शिगेला पोहोचली आहे. आपल्या मतदारसंघात सर्व मतदारांची नजर असेलच. मात्र, देशभरातील जनतेचे लक्ष देशातील काही मोठ्या जागांवर लागून राहणार आहे. या जागांवर देशातील दिग्गज नेते आपले आपले भाग्य आजमावणार आहेत.

बडतर्फ जवान तेजबहादूर यादव मोदींविरोधात लढणार निवडणूक

सैनिकांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाला निलंबित केले होते. हाच जवान आता लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवणार आहे. तेजबहादूर यादव असे त्या जवानाचे नाव आहे.

पंतप्रधान मोदींच्या 'त्या' भाषणाने आचारसंहितेचा भंग नाही

भारताने 'मिशन शक्ती' अंतर्गत उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची (ए-सॅट) यशस्वी चाचणी घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून दिली होती. या भाषणाने कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे.

सत्तेत आलो तर नीती आयोग बरखास्त करु - राहुल गांधी

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जर काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला तर नीती आयोग (NITI - नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया) बरखास्त करू, असे त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. नीती आयोगाने मोदी सरकारचे मार्केटिंग आणि आकड्यांमध्ये फेरफार करण्याशिवाय काहीही काम केलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी १२ एप्रिलला प्रचारासाठी गोव्यात

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी १२ एप्रिलला भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ गोव्यात येणार आहेत. यावेळी ते प्रचारसभेला संबोधित करतील, असे गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही सभा उत्तर गोव्यात होणार असून अद्याप सभेची जागा निश्चित करण्यात आलेली नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.