ETV Bharat / bharat

देशभरात सरासरी ५५.६० टक्के मतदान; ७१ मतदार संघांच्या उमेदवारांचे भविष्य EVMमध्ये बंद

चौथ्या टप्प्यामध्ये ९ राज्यांच्या ७१ लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. जवळपास १२ कोटी ८२ लाख ६७ हजार ४२९ मतदार एकूण ९४५ उमेदवारांचे भाग्य ठरवणार आहेत.

Election
author img

By

Published : Apr 29, 2019, 7:35 AM IST

Updated : Apr 29, 2019, 9:59 PM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यामध्ये ९ राज्यांच्या ७१ लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. जवळपास १२ कोटी ८२ लाख ६७ हजार ४२९ मतदार एकूण ९४५ उमेदवारांचे भाग्य ठरवणार आहेत. सकाळी ७ वाजेपासून सर्व मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे.

Live Updetes :

5:00 PM - देशातील ९ राज्यांमध्ये होणाऱ्या चौथ्याटप्प्यातील मतदान प्रक्रियेत सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५०.६० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

3:00 PM - देशभरातील ७१ लोकसभा मतदार संघांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत जवळपास ४९.५३ टक्के मदतानाची नोंद झाली आहे.

2:00 PM - क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन यांनी वांद्रे येथे मतदानाचा हक्क बजावला. सारा आणि अर्जुन यांनी प्रथमच मतदान केले.

1:40 PM - अभिनेता सलमान खान याने मुंबईतील वांद्रे येथे मतदान केले.

1:20 PM - अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी मुंबईत जुहू येथे मतदान केले.

1:05 PM - भाजपच्या अमेठीतील उमेदवार स्मृती इराणी यांनी पती झुबिन इराणी यांच्यासह मुंबईतील वर्सोवा येथे मतदान केले.

12:50 PM - केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला.

12:15 PM - शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह मतदान केले.

11:50 AM - शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी मतदान केले.

11:25 AM - चित्रपट निर्माता मधुर भांडारकर यांनी पत्नी रेणू नांबूदिरी यांच्यासह वांद्रे येथे मतदान केले.

11:05 AM - मुंबईत महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मुंबईत मलबार हिल येथे मतदानाचा हक्क बजावला.

10:40 AM - झारखंडच्या पलामू मतदार संघातील जगोडीह या माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात प्रथमच मतदान.

10:20 AM - एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांनी मुंबईत पेड्डर रोड येथे मतदान केले.

10:00 AM - पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे मतदान केंद्रावर हाणामारी. पोलिसांकडून लाठीमार.

9:45 AM - पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे भाजप उमेदवार बाबुल सुप्रियो यांच्या गाडीची तोडफोड.

9:30 AM - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ताडदेव येथे मतदान केले.

9:15 AM - सीपीआयचा उमेदवार कन्हैया कुमार याने बेगुसराय येथे मतदानाचा हक्क बजावला.

9:00 AM - जम्मू-काश्मीरमध्ये कुरिगाम आणि कुलगाम येथे मतदान.

8:45 AM - उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील छिब्रामाऊ येथे ३५ आणि ४३५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर व्होटिंग मशीनमधील बिघाडामुळे अद्याप मतदान सुरू झालेले नाही.

8:30 AM - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी छिंदवाडा येथील शिकारपूर येथे मतदान केले.

8:15 AM - अभिनेता आणि भाजप खासदार परेश रावल आणि त्यांच्या पत्नी स्वरूप संपत यांनी मुंबईत विले पार्ले येथे मतदानाचा हक्क बजावला.

8:00 AM - गोरखपूर येथील भाजप उमेदवार अभिनेता रवि किशन यांनी मुंबईत गोरेगाव येथे मतदान केले.

7:50 AM - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मुंबईत पेड्डर रोड येथे मतदान केले.

7:45 AM - ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी मुंबईत वांद्रे येथे बजावला मतदानाचा हक्क.

7:40 AM - मुंबई उत्तर-मध्य येथील भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी वरळी येथे मतदान केले.

7:30 AM - राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया यांनी झालावर येथे मतदान केले.

7:25 AM - ओडिशामध्ये मतदानास सुरुवात

7:15 AM - मुंबईत उद्योगपती अनिल अंबानींनी मतदान केले.

7:10 AM - केंद्रीय मंत्री आणि नवादा येथील खासदार गिरीराज सिंह यांनी बिहारमध्ये लखिसराई जिल्ह्यातील बाराहिया येथे मतदान केले.

7:00 AM - देशभरात चौथ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात. मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा

Intro:Body:

Dummy

Conclusion:
Last Updated : Apr 29, 2019, 9:59 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.