नवी दिल्ली - काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती राबर्ट वाड्रा लोकसभा निवडणुकांसाठी देशभर काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. केवळ राहुल गांधी आणि सोनिया गांधींसाठी प्रचार करणार नसून संपूर्ण पक्षासाठी देशभर प्रचार करणार असल्याचे ते म्हणाले. या बातमीनंतर 'रॉबर्ट वाड्रा प्रचार तर करणार. पण फायदा होणार कोणाला? काँग्रेसला की भाजपला?' अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी वाड्रा यांची खिल्ली उडवली.
-
Robert Vadra to ANI when asked if he will campaign for Congress party for the #LokSabhaElections2019: Yes. All over India, after the filing of nominations (by Rahul Gandhi and Sonia Gandhi) (file pic) pic.twitter.com/NdR3aVlSui
— ANI (@ANI) April 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Robert Vadra to ANI when asked if he will campaign for Congress party for the #LokSabhaElections2019: Yes. All over India, after the filing of nominations (by Rahul Gandhi and Sonia Gandhi) (file pic) pic.twitter.com/NdR3aVlSui
— ANI (@ANI) April 7, 2019Robert Vadra to ANI when asked if he will campaign for Congress party for the #LokSabhaElections2019: Yes. All over India, after the filing of nominations (by Rahul Gandhi and Sonia Gandhi) (file pic) pic.twitter.com/NdR3aVlSui
— ANI (@ANI) April 7, 2019
याआधी फेब्रुवारीमध्ये वाड्रा यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. यानंतर गाझियाबादमध्ये 'गाझियाबाद करे पुकार, रॉबर्ट वाड्रा अबकी बार' असे त्यांच्या समर्थनार्थ पोस्टरही लागले होते. मात्र, आता रॉबर्ट वाड्रांनी काँग्रेसच्या प्रचारात सहभाग घेतला, तर ते भाजपच्या निशाण्यावर राहण्याची शक्यता आहे. सध्या अवैध संपत्ती प्रकरणी वाड्रा यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. अन्वेषण संस्थेने आरोपींनी पेट्रोलियम आणि संरक्षण व्यवहारांमध्ये लाच घेतल्याचाही दावा केला आहे.
-
Union Finance Minister & BJP leader Arun Jaitley on Robert Vadra to campaign for Congress party for the #LokSabhaElections2019: I don't know if this will be an asset for the campaign of Congress party or for the campaign of BJP. pic.twitter.com/xZyGiw0Xuy
— ANI (@ANI) April 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Union Finance Minister & BJP leader Arun Jaitley on Robert Vadra to campaign for Congress party for the #LokSabhaElections2019: I don't know if this will be an asset for the campaign of Congress party or for the campaign of BJP. pic.twitter.com/xZyGiw0Xuy
— ANI (@ANI) April 7, 2019Union Finance Minister & BJP leader Arun Jaitley on Robert Vadra to campaign for Congress party for the #LokSabhaElections2019: I don't know if this will be an asset for the campaign of Congress party or for the campaign of BJP. pic.twitter.com/xZyGiw0Xuy
— ANI (@ANI) April 7, 2019
या प्रकरणात एक एप्रिलला विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या जवळचे सहकारी मनोज अरोरा यांना ५ लाख रुपयांच्या जामीनपत्रावर अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने जामीनासह या दोघांवर पूर्वपरवानगीशिवाय देश न सोडण्याची अटही ठेवली आहे. तसेच, या दोघांना तपासास पूर्ण सहकार्य करण्याचे आणि पुरावे आणि साक्षीदारांसोबत कोणताही गैरप्रकार न करण्याचा इशारा दिला आहे.
रॉबर्ट वाड्रा काँग्रेसचा प्रचार करण्यात सक्रिय झाल्यास याचा भाजपकडून फायदा घेतला जाऊ शकतो. वाड्रा यांची डागाळलेली प्रतिमा काँग्रेससाठी धोकादायक ठरू शकते.