ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींनी केले अमित शाहांचे कौतुक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सुमारे 1 तास तपशीलवार भाषण केले. विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढत हे विधेयक देशातील अल्पसंख्याकांविरुद्ध नसल्याचे शाह यांनी ठासून सांगितले.

AMIT Shah
अमित शाह
author img

By

Published : Dec 10, 2019, 1:14 AM IST

नवी दिल्ली - बारा तासांच्या चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत 311 विरुद्ध 80 मतांनी मंजूर झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या खासदारांचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे लोकसभेत चर्चेदरम्यान संबंधित खासदारांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांना विस्तृत उत्तरे दिल्याबद्दल अमित शाह यांचे कौतुक देखील केले.

  • I would like to specially applaud Home Minister @AmitShah Ji for lucidly explaining all aspects of the Citizenship (Amendment) Bill, 2019. He also gave elaborate answers to the various points raised by respective MPs during the discussion in the Lok Sabha.

    — Narendra Modi (@narendramodi) December 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Delighted that the Lok Sabha has passed the Citizenship (Amendment) Bill, 2019 after a rich and extensive debate. I thank the various MPs and parties that supported the Bill. This Bill is in line with India’s centuries old ethos of assimilation and belief in humanitarian values.

    — Narendra Modi (@narendramodi) December 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सुमारे 1 तास तपशीलवार भाषण केले. विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढत हे विधेयक देशातील अल्पसंख्याकांविरुद्ध नसल्याचे शाह यांनी ठासून सांगितले.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पटलावर मांडले जावे की मांडले जाऊ नये, यावर मतदान घेण्यात आले. यात 293 सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने कौल दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. या विधेयकावर तब्बल 12 तास चर्चा झाली.

सर्व सुधारणांवर आवाजी मतदान घेण्यात आल्यानंतर हे विधेयक संमत करण्यात यावे, असा प्रस्ताव अमित शाह यांनी मांडला. त्यावर प्रथम आवाजी मतदान घेण्यात आले व त्यानंतर सदस्यांच्या मागणीनुसार मतविभाजन घेण्यात आले. 311 विरुद्ध 80 मतांनी हे दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले.

Intro:Body:

1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.