ETV Bharat / bharat

BHARAT DECIDES : पंजाब वगळता उत्तर भारतावर भाजपचेच वर्चस्व - election

उत्तर भारतील पंजाब वगळता दिल्ली, उत्तराखंड, जम्मू कश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यात भाजप आघाडीवर आहे. या हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपचेच वर्चस्व असल्याचे पहायला मिळत आहे.

पंजाब वगळता उत्तर भारतावर भाजपचेच वर्चस्व
author img

By

Published : May 23, 2019, 4:40 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीमधील लोकसभेच्या सर्व सात जागांवर भाजप आघाडीवर आहे. ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी, दक्षिण दिल्लीतून रमेश बिधूडी, पश्चिम दिल्लीतून प्रवेश वर्मा, नवी दिल्लीतून मीनाक्षी लेखी, वायव्य दिल्लीतून हंसराज हंस, चांदनी चौकमधून हर्षवर्धन आणि पूर्व दिल्लीतून गौतम गंभीर हे आघाडीवर आहेत. गौतमबुद्ध नगरमधून महागठबंधन मागे असून भाजपचे महेश शर्मा आघाडीवर आहेत. गाजियाबादमधून भाजपचे वीके सिंह 20 हजार मतांनी पुढे आहे.

पंजाब : पंजाबमध्ये काँग्रेस १० जागांवर पुढे आहे. तर अकाली-भाजप हे दोन तर आप एका जागेवर पुढे आहे. पंजाबमध्ये १९ मे ला एकाच टप्प्यात मतदान झाले होते. पंजाबमध्ये १३ लोकसभेच्या जागा आहेत. पंजाबमध्ये गुरदासपुर, अमृतसर, खडूर साहिब, जालंधर, होशियारपुर, आनंदपुर साहिब, लुधियाना, फतेहगढ़ साहिब, फरीदकोट, फिरोजपुर, बठिंडा, संगरूर आणि पटियाला लोकसभा मतदारसंघ आहेत.

श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये लोकसभेचे सहा मतदारसंघ आहेत. यात ऊधमपुर-डोडा, जम्मू-पुँछ, लद्दाख, बारामुला, श्रीनगर आणि अनंतनाग यांचा समावेश आहे. येथील तीन जागांवर भाजप आघाडीवर आहे. अनंतनाग येथून अपक्ष उमेदवार हसनैन मसूदी हे काँग्रेसचे गुलाम अहमद यांच्या पुढे आहे. लद्दाख मतदारसंघातून भाजपचे जामयंग शेरिंग नामग्याल यांना मागे टाकून अपक्ष उमेदवार सज्जाद हुसैन आघाडीवर आहेत. बारामुला येथून अपक्ष उमेदवार इंजीनियर राशिद, जम्मू मधून भाजपचे जुगल किशोर, ऊधमपुर येथून भाजपचे जितेंद्र सिंह, श्रीनगरमधून जम्मू-कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला पुढे आहेत.

राजस्थान : फक्त पाच महिन्यापूर्वी असलेल्या परिस्थितीत आता बदल झाला आहे. राजस्‍थानच्या २५ लोकसभा जागांवर भाजपने चमकदार कामगिरी केली आहे. भाजपने २०१४ मधील आपले प्रदर्शन कायम ठेवले आहे. तर काँग्रेसला फक्त दोन ते तीन जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत लोकांनी काँग्रेसला विजयी केले होते. मात्र आता चित्र बदलेले असल्याचे दिसत आहे.

उत्तर प्रदेश : - उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त लेकसभा मतदारसंघ असलेले राज्य असल्याने या राज्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढे तर अमेठी येथून राहुल गांधी पिछाडीवर आहेत. राज्यात ८० जागा असून भाजपला सर्वात जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप-मित्रपक्ष ५४, महागठबंधन २४, काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे.

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशमध्ये सर्वच जागांवर भाजप आघाडीवर आहे. कांगडा येथून भाजपचे किशन कपूर, मंडी येथून रामस्वरूप शर्मा, हमीरपूर येथून अनुराग ठाकुर, शिमला येथून सुरेश कुमार कश्यप हे विजयी झाले आहेत. राज्यातील सर्व चार जागांवर भाजपा, काँग्रेससहित ४५ उमेदवार निवडणुकीस उभे होते. सर्वात जासेत १७ उमेदवार हे मंडी लोकसभा मतदारसंघात उभे होते. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने काँग्रेसचा मोठा पराभव केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर २०१९ मध्ये भाजपने चारही लोकसभा जागांवर विजय मिळवला.

उत्तराखंड : देवभूमी अशी ओळख असणाऱया उत्तराखंड राज्य भाजपय होण्याची शक्यता आहेत. येथे असणाऱया पाचही जागा भाजपच्या खात्यात जाताना दिसत आहे. मागील निवडणुकीत भाजपने चार जागा काँग्रेसकडून हिसकावल्या होत्या. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगले प्रदर्शन केले होते. मात्र, यावेळी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगली तयारी केली होती. उत्तराखंडमधील सर्व पाच जागांवर भाजप पुढे आहे. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष अजय भट्ट यांनी या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.