ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणूक : 'या' जागांवर असणार देशाचे लक्ष; दिग्गज मैदानात - Kanhaiya kumar

लोकसभा निवडणुकांमध्ये वाराणसी, अमेठी, रामपूर, बेगुसराय आणि भोपाळ सारख्या मतदार संघावर संपूर्ण देशाचे लक्ष राहणार आहे. जाणून घेऊ येथील गणितं.

लोकसभा निवडणूक
author img

By

Published : Mar 30, 2019, 11:53 AM IST

Updated : Mar 30, 2019, 2:39 PM IST

हैदराबाद - लोकसभा निवडणुकांना मोजून ११ दिवस शिल्लक आहेत. संपूर्ण देशभरात या उत्सवाची तयारी शिगेला पोहोचली आहे. आपल्या मतदारसंघात सर्व मतदारांची नजर असेलच. मात्र, देशभरातील जनतेचे लक्ष देशातील काही मोठ्या जागांवर लागून राहणार आहे. या जागांवर देशातील दिग्गज नेते आपले आपले भाग्य आजमावणार आहेत.

वाराणसी -

lok sabha
नरेंद्र मोदी, चंद्रशेखर आझाद आणि तेजबाहादुर यादव

वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढणार आहेत. संपूर्ण देशाचेच नाही तर जगभराचे लक्ष या जागेच्या निकालावर लागून राहणार आहे. मोदी यांना ही निवडणूक लढवणे मात्र यावेळी सोपे जाणार नाही. कारण या जागेवरून भीमआर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद आणि बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आलेले तेजबाहादूर यादव यांचे आव्हान असणार आहे. चंद्रशेखर आझाद मोदींना टक्कर देण्यासाठी तयारी करत आहेत. त्यांच्या या जागेवर मोठा प्रभाव असल्याचे म्हटले जाते. नुकतेच रासुका अंतर्गत ते तुरुंगात होते. सुटका झाल्यानंतर त्यांनी मोठे समर्थक जमवले आहेत.

अमेठी -

lok sabha
स्मृती ईराणी आणि राहुल गांधी

काँग्रेसचा गड असलेल्या अमेठीमधून यावेळीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात मोठे आव्हान आहे, ते भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांचे. यापूर्वी २०१४च्या निवडणूकांमध्येही त्यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांना ४ लाख ८ हजार मत मिळाले होते. तर स्मृती ईराणी यांना ३ लाख मतांवर समाधान मानावे लागले होते.
या जागेवर मागील अनेक वर्षांपासून गांधी घराणे वरचढ राहिलेले आहे. मात्र, स्मृती ईराणी यांच्या ५ वर्षाच्या अनुभवामुळे यावेळी काट्याची टक्कर होणार आहे.

रामपूर -

lok sabha
जयाप्रदा आणि आजम खान

बॉलिवूड अभिनेत्री आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयाप्रदा या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. रामपूर येथून त्यांनी यापूर्वी २ वेळा निवडणूक जिंकलेली आहे. मात्र, त्यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे मोठे आव्हान आहे. येथून या पक्षाचे आजम खानही निवडणूक लढवत आहेत. आजम आणि जयाप्रदा यांची राजकीय दुश्मनी जगजाहीर आहे. आजम खान यांचा या मतदारसंघात मोठा वचक आहे. तर अनेक वर्षापासून या जागेवर समाजवादी पक्षाचा ताबा राहिला आहे.

बेगुसराय -

lok sabha
गिरिराज सिंह आणि कन्हैया कुमार

बेगुसरायवर देशाचे विशेष लक्ष लागून राहणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंहाचे मोठे आव्हान आहे. कन्हैया कुमार भाजपला पूर्वीपासूनच फैलावर घेत आले आहेत. तसेच त्यांच्या लोकप्रियतेमुळे भाजपसोबत येथे मोठी टक्कर होण्याची संभावना आहे. कन्हैया कुमार यांना डाव्या पक्षांनी येथे समर्थन जाहीर केले आहे. त्यामुळे गिरिराज सिंह येथे आपली जादू चालवू शकतील का ? यावर सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

भोपाळ -

lok sabha
शिवराज सिंह चौहान आणि दिग्विजय सिंह

भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने आपले वरिष्ठ नेते दिग्विजय सिंहांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना उमेदवारी देण्याची तयारी करत आहे. त्यामुळे या जागेवर चांगलीच चुरस होण्याची शक्यता आहे. कारण दिग्विजय सिंह हेही मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तर, या जागेवर त्यांची चांगलीच पकड आहे. मात्र, भाजपनेही शिवराज चौहानाच्या रुपात त्यांच्यासमोर आव्हान ठेवले आहे.

Intro:Body:

लोकसभा निवडणूक : 'या' जागांवर असणार देशाचे लक्ष; दिग्गज मैदानात

लोकसभा निवडणुकांमध्ये 'या' जागांवर असणार देशभराचे लक्ष; दिग्गज मैदानात

Conclusion:
Last Updated : Mar 30, 2019, 2:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.