पाटणा- कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने बिहारमधील व्हिडिओ कॉलिंगद्वारे विवाह केला आहे. यातील वधू ही पाटणा येथील तर वर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील आहे. हा विवाह (निकाह) दोन्हीकडील कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला.
सादिया नसरीन आणि गाझियाबाद येथील दानिश रझा यांचा विवाह 23 मार्च रोजी झाला. सादिया आणि दानिश यांचा विवाह पाटणा येथील हरुन नगर येथील मंगल कार्यालयात होणार होता. यासाठी नातेवाईकांना निमंत्रण पाठवले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे पारंपरिक पद्धतीने त्यांना विवाह करता आला नाही. त्यामुळे सादिया आणि दानिश यांनी विवाह करण्यासाठी वेगळा मार्ग निवडत व्हिडिओ कॉलिंगने विवाह करण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओ काॉलिंगद्वारे झालेल्या विवाहाला वर आणि वधूचे कुटुंबीय दोघांच्या घरी उपस्थित होते.
सादिया नसरीन यांच्याकडील व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओत सादिया नसरीन शेवटी टी.व्ही.स्क्रीनवर तिच्या पतीला पाहत असल्याचे दिसते. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने कुठेही मोठ्या संख्येने एकत्र येत कार्यक्रम करण्यास परवानगी नाही.