देहराडून - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे नागरिक आपापल्या घरांमध्ये बसले आहेत. रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे ओस पडली आहेत. या वातावरणाचा फायदा मात्र, प्राण्यांनी आणि पक्ष्यांनी घेतल्याचे दिसत आहे. हरिद्वारमध्ये असाच एक हत्ती बिनधास्तपणे रस्त्यांवर फिरत आहे.
रामनवमीच्या मुहूर्तावर हरिद्वारमधील गंगा घाटावर स्नान करण्यासाठी लाखो नागरिक गर्दी करत असतात. या वर्षी मात्र, कोरोनामुळे गंगा घाट रिकामे आहेत. याचाच फायदा घेत हरकी पैडी घाटावर हा हत्ती मनसोक्त फिरत आहे.
हेही वाचा - अध्यात्मिक गायक पद्मश्री निर्मल सिंह यांचा कोरोनाने मृत्यू!
लॉकडाऊनच्या काळात हरिद्वारमधील नागरी वसाहतींकडे जंगली प्राण्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. वन विभागाच्या अनेक प्रयत्नांनंतरही प्राणी लोकवस्तीत येत आहेत. बुधवारी रात्री देखील एक हत्ती रस्त्यांवर फिरत होता. हत्तीसारख्या प्राण्याचे मानवी वस्तीत फिरण्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.