चिक्काकोलुथुरू (कर्नाटक): कर्नाटक राज्याच्या कोडागु जिल्ह्यात चिक्काकोलुथुरू येथे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सतीश यांनी संचारबंदीदरम्यान घरात असताना फावल्या वेळेचा उपयोग करत घरातच एक छोटीशी बाग तयार केली आहे.
कोरोनामुळे खबरदारी म्हणून देशभरात संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. याचाच फायदा घेत अनेकांनी आपल्या सुप्त गुणांना वाव देत घरात बसून नवनवीन कल्पनांना आकार दिला आहे. कर्नाटक राज्यातील एका प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या सतीश यांनीही घरातील टाकाऊ वस्तूंचा वापर करत एक सुंदरशी बाग तयार केली आहे. या छोट्याशा बागेत लहान धबधबा, तळे आणि पक्ष्यांच्या विश्रांतीकरता एक लहान जागा तयार करण्यात आली आहे. यातील धबधब्याला सिमेंटचा वापर करून तयार करण्यात आले आहे. तर, तळ्यावर नायलॉन धाग्यांचा वापर करुन एक सस्पेंशन ब्रिजदेखील त्यांनी तयार केला असून हा ब्रिज जो बागला नाविन्यपूर्ण स्वरूप देते.
याबाबत सांगताना सतिश म्हणाले, "माझा कल हा सेंद्रिय शेतीकडे असून त्यातूनच मला ही छोटी बाग तयार करण्याची स्फूर्ती मिळाली. या बागेत आपण अनेक प्रकारची रोपटे लावले असल्याचे त्यांनी सांगितले. यासह ही बाग घरातील टाकावू वस्तूंचा वापर करून तयार केली असून या बागेत आपण जवळपास १० प्रकारचा भाजीपाला उगवत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजण अचानक घरात कैद झाले. मात्र, या बंदीमुळे लोकांना त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणांना परत बाहेर काढण्याची एक संधीच मिळाली. या बंदमध्ये अनेक पर्यवरण प्रेमींना निसर्गाशी परत जुळवून घेत बागकामाला सुरुवात केली. तर, काहींना या बागकाम कौशल्य शिकण्यास सुरुवात केली. आता या माध्यमातून घरात असलेल्या मर्यादित जागेतही बाग कशी फुलवायची याबाबत अनेकांना कल्पना सुचून त्यांनी अंमलात आणली. त्यामुळे, या बंदच्या काळात अनेक जणांनी अंगिकारलेली ही कला त्यांच्याकरता तणाव घालवण्यासाठीही उपयोगी पडली आहे. तर दुसरीकडे, हा अतिरिक्त वेळ बाग प्रेमींसाठी चांगली संधी असून लोकांनी त्यांच्यातील बागकामाचे कौशल्य शोधले पाहिजे. या शांततापूर्ण काळ हा वनस्पती प्रेमींसाठी निसर्गाच्या सानिध्याचा आनंद घेण्याची एक सुवर्णसंधी आहे, असेही तज्ञांनी सांगितले असल्याचे सतीश म्हणाले.