अमरावती (आंध्र प्रदेश) - कडपा जिल्ह्यातील चिन्ना वेंतुर्ला येथे भातशेतीत काम करताना ट्रॅक्टर उलटून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. चिखलामध्ये रुतलेले ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली असून संजीव कर्णा (३०), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सध्या भात लावणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे संजीव हे वेंतुर्ला येथे भातलावणीसाठी ट्रॅक्टरने चिखल करत होते. यावेळी ट्रॅक्टरची चाके चिखलात खोलवर रुतली. त्यामुळे ट्रॅक्टर वळविण्यात अडचण निर्माण झाली. सर्व शेतकऱ्यांनी धक्का मारून सुद्धा ट्रॅक्टर चिखलातून बाहेर निघत नव्हते. त्यानंतर चिखल बाजूला सारून ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ट्रॅक्टर उलटून यामध्ये संजीव यांचा मृत्यू झाला. यावेळी शेतातीलच कोणीतरी मोबाईलवर व्हिडिओ बनवत होते. त्यामध्ये ही दुर्घटना कैद झाली आहे. शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी, असा परिवार आहे.