ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणूक : चौथ्या टप्प्यात ७१ जागांसाठी ९४५ उमेदवार रिंगणात, १३ कोटी मतदार बजवणार मताधिकार

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार बिहारच्या ५ जागा, जम्मू आणि काश्मीरची एक आणि झारखंडच्या ३ जागा. तसेच मध्यप्रदेश आणि ओडिशाच्या प्रत्येकी ६, महाराष्ट्र १७ आणि राजस्थान उत्तरप्रदेशच्या प्रत्येकी १३ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या ८ जागांचाही समावेश आहे.

सांकेतिक छायाचित्र
author img

By

Published : Apr 29, 2019, 12:05 AM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यामध्ये ९ राज्यांच्या ७१ लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. जवळपास १२ कोटी ८२ लाख ६७ हजार ४२९ मतदार एकूण ९४५ उमेदवारांचे भाग्य ठरवणार आहेत. यामध्ये देशातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी ७ वाजेपासून सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरू होईल.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार बिहारच्या ५ जागा, जम्मू आणि काश्मीरची एक आणि झारखंडच्या ३ जागा. तसेच मध्यप्रदेश आणि ओडिशाच्या प्रत्येकी ६, महाराष्ट्र १७ आणि राजस्थान उत्तरप्रदेशच्या प्रत्येकी १३ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या ८ जागांचाही समावेश आहे.

चौथ्या टप्प्यामध्ये एकूण १२ कोटी ८२ लाख ६७ हजार ४२९ मतदार मतदान करणार आहेत. त्यामध्ये ६ कोटी ७ लाख ८० हजार महिला मतदार तर, ६ कोटी ७४ लख ८३ हजार ४४९ पुरुष मतदारांचा समावेश आहे. या नवही राज्यांमध्ये एकूण ३ हजार ९२५ तृतियपंथी मतदारांचाही समावेश आहे. यांच्यासाठी १ लाख ४० हजार मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.

  • महाराष्ट्र -

महाराष्ट्रासाठी हा शेवटचा टप्पा असून १७ लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडत आहे. नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई यांचा यामध्ये समावेश आहे. तर, मावळ, शिरूर आणि शिर्डी येथेही मतदान होत आहे.

राज्यात एकूण ३३ हजार ३१४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे एकूण ३ कोटी ११ लाख ९२ हजार ८२३ मतदार मताधिकाराचा उपयोग करतील. जवळपास ३२३ उमेदवारांचे भाग्य हे मतदार ठरवणार आहेत. यामध्ये १ कोटी ६६ लाख ३१ हजार ७०७ पुरूष मतदार तर १ कोटी ४५ लाख ५९ हजार ६९८ महिला मतदार आहेत.

  • बिहार -

बिहारमध्ये ५ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. दरभंगा, उजियारपूर, समास्थिपूर, बेगुसराय आणि मुंगेर या मतदार संघांचा यामध्ये समावेश आहे. या मतदार संघात ६६ उमेदवार रिंगणात असून एकूण ८७ लाख ९२ हजार ५४८ मतदार मतदान करतील. येथे ८ हजार ८३४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • जम्मू काश्मीर -

जम्मू काश्मीर येथे अनंतनाग लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पाडत आहे. विशेष म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने एकट्या अनंतनाग मतदान क्षेत्रामध्ये लोकसभेच्या ३ टप्प्यात मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. येथे ४३३ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. ज्यामध्ये ३ लाख ४४ हजार २२४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

झारखंड-

झारखंडमध्ये राजमहाल, दुमका आणि गोड्डा या मतदारसंघात मतदान होत आहे. येथे ५९ उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उभे आहेत. जवळपास ३ हजार १३ मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार. येथे ४५ लाख २६ हजार ६९३ मतदार मतदान करणार आहेत.

  • मध्य प्रदेश -

मध्य प्रदेशच्या ६ जागांसाठी आज मतदान होईल. सीधी, शाहडोल, जबलपूर, मंडला, बालाघाट आणि छिंदवाडा या मतदार संघाचा त्यामध्ये समावेश आहे. यासाठी एकूण १०८ उमेदवार निवडणूक लढत आहेत. मतदान करण्यासाठी जवळपास १३ हजार ४९१ मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. तर, १ कोटी ५ लाख ५५ हजार ६८९ मतदार येथील उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत.

  • ओडिशा-

ओडिशाच्या ६ मतदारसंघासाठीही आज मतदान होईल. यामध्ये मयुरभंज, बालासोर, भद्रक, जजपूर, केंद्रापाडा आणि जगतसिंहपूर या मदतार संघांचा समावेश आहे. येथे एकूण ५२ उमेदवार रिंगणात आहेत. जवळपास १० हजार ७९२ मतदान केंद्रामध्ये मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, ९५ लाख १४ हजार ८८३ उमेदवार मतदान करणार.

  • राजस्थान -

राजस्थानमध्ये १३ लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. टोंक सवाई माधोपूर, अजमेर, पाली, जोधपूर, भारमेर, जालोर, उदयपूर, बंसवारा, चित्तोरगड, राजसमंद, भिलवाडा, कोटा आणि झलावाड-बारन या मतदारसंघासाठी मतदान होत आहे. त्यासाठी ११५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यासाठी जवळपास २८ हजार १८२ मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. २ कोटी ५७ लाख ७६ हजार ९९३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

  • उत्तर प्रदेश -

उत्तर प्रदेशातील १३ लोकसभेच्या जागांसाठीही आज मतदान होणार आहे. त्यामध्ये शहाजाहांपूर, खेरी, हरदोई, मिश्रीक, उन्नाव, फारुखाबाद, इटावा, कन्नौज, कानपूर, अकबरपूर, जालौन, झांसी आणि हमिरपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. येथे एकूण १५४ उमेदवार रिंगणात आहेत. २ कोटी ३८ लाख ८८ हजार ३६७ मतदार यांचे भाग्य ठरवणार आहेत. त्यासाठी एकूण २७ हजार ५१३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • पश्चिम बंगाल -

पश्चिम बंगालमधी ८ जागांवरही आज मदतान होईल. त्यामध्ये बहरमपूर, कृष्णनगर, राणाघाट, बर्धमान पुरबा, बर्धमान दुर्गापूर, असानसोल, बोलपूर आणि बीरभूम या मतदारसंघांचा समावेश आहे. येथे ६८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. जवळपास १५ हजार २७७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून एकूण १ कोटी ३४ लाख ५६ हजार ४९१ मतदार उद्या मतदान करतील.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.