नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड, दिल्लीत एनडीएच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत निर्णय
नवी दिल्ली - १७ व्या लोकसभेची स्थापना ३ जूनपर्यंत केली जाणार असून या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत मंत्रिमडळ स्थापन केले जाणार आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डावलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सविस्तर वाचा...
राहुल गांधींचा राजीनामा एकमुखाने फेटाळला.. काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठकीत पराभवावर आत्मचिंतन
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस कार्यकारणीची बैठक आज दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राहुल गाधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. मात्र, कार्यकारिणीने तो एकमुखाने फेटाळून लावला. सध्याच्या परिस्थितीत राहुल गांधींचे नेतृत्वच काँग्रेसला उभारी देऊ शकते, असा विश्वास काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सविस्तर वाचा...
ममता बॅनर्जींचाही पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव
कोलकाता - लोकसभेमध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव ममतांच्या जिव्हारी लागला आहे. भाजपने येथे घवघवीत यश संपादन केले आहे. तृणमुलच्या कामगिरीची जबाबदारी स्वीकारत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीएमसीच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत ममतांनी पक्षश्रेष्ठींकडे त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. आज पत्रकार परिषदेत ममतांनी याबाबत माहिती दिली आहे. सविस्तर वाचा...
रामराजे तर बिन लग्नाची अवलाद, मी ओरिजनल नाईक निंबाळकर; खासदार रणजितसिंहांचा घणाघात
सातारा - "मी ओरिजनल नाईक-निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासाल तर हा रणजित ९६ पिढ्यांपासून नाईक निंबाळकर असल्याचे पाहायला मिळेल". परंतु तुमचं काय तुम्ही स्वतःला नाईक-निंबाळकर म्हणता आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगाता. मात्र, तुमच्या आईचे आणि वडिलांचे लग्न झाले असेल तर त्या लग्नाचा दाखला मला दाखवा. आणि जो कोणी मला दाखला देईल त्याला मी एक हजाराचे बक्षीस देईन. कारण, रामराजे हे बिन लग्नाची अवलाद आहेत आणि हा इतिहास आहे, असा घणाघाती आरोप माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केला आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर फलटनमध्ये आयोजित सभेत बोलताना निंबाळकर यांनी हा जिव्हारी लागणारा घणाघात केला आहे. सविस्तर वाचा...
रायगडमध्ये पॅराग्लाइडिंग करताना दोर तुटून बाप-लेक कोसळले; मुलाचा जागीच मृत्यू
रायगड - जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनारी पॅराग्लाइडिंग करताना दोरी तुटून वडील आणि मुलगा खाली पडून अपघात झाला. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला असून वडिलांना मुरुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान पॅरासेलिंग चालकावर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा...