ETV Bharat / bharat

जाणून घ्या एखादी लस तयार होण्यासाठी किती वेळ लागतो? प्रक्रिया काय?

author img

By

Published : Nov 27, 2020, 2:48 PM IST

Updated : Nov 28, 2020, 5:01 PM IST

लसीच्या क्लिनिकल चाचणीचे तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्यात कमी जणांवर लसीची चाचणी केली जाते. दुसऱ्या टप्प्यात लसीचे वैद्यकीय परीक्षण केले जाते. पुढे ही लस त्या लोकांना दिली जाते, ज्यांचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम आणि वय कमी आहे. तिसऱ्या टप्प्यात लस हजारो लोकांना दिली जाते आणि त्यावरून लसीची परिणामकारकता आणि सुरक्षिततेचे परीक्षण केले जाते. लसीसाठी मंजुरी आणि परवाना मिळाल्यानंतर चौथा टप्पा पार करावा लागतो.

corona vaccine news
कोरोनावरील लस शोधण्यासाठी किती वेळ

हैदराबाद - सध्या जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना व्हायरसची लस शोधण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र अजूनही लस तयार झाली नाही. काही देशांनी लस बनवली देखील आहे. भारत, अमेरिका, चीन आणि रशिया यासारख्या देशांत लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आली आहे. तुम्हाला माहिती आहे लस बनवण्यासाठी किती वेळ लागतो आणि त्यासाठी किती टप्पे आहेत ? तर जाणून घेऊयात या कार्यपद्धतीबद्दल...

कुठलीही लस बनवण्यासाठी जवळपास चार वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र कोरोनावरील लसीसाठी हे काम वेगाने सुरू आहे. तसेच चीनने या लसीसाठी आनुवंशिक क्रमांचा अभ्यास जानेवारीतच सुरू केला होता, जेव्हा केवळ चीनमध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव होता.

टप्पा 1

पहिल्या टप्यात कमी जणांवर लसीची चाचणी केली जाते. दुसऱ्या टप्प्यात लसीचे वैद्यकीय परीक्षण केले जाते. पुढे ही लस त्या लोकांना दिली जाते ज्यांचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम आणि वय कमी आहे. तिसऱ्या टप्प्यात लस हजारो लोकांना दिली जाते आणि त्यावरुन लसीची परिणामकारकता आणि सुरक्षिततेचे परीक्षण केले जाते. लसीसाठी मंजुरी आणि परवाना मिळाल्यानंतर चौथा टप्पा पार करावा लागतो.

टप्पा 2 - प्री क्लिनिकल

संशोधन आणि विकासाच्या निष्कर्षानंतर, प्राणी आणि वनस्पतींवरही लसीच्या परिणामकारकतेचे आणि कार्यप्रणालीचे परीक्षण केले जाते. लस दिल्यावर प्राणी आणि वनस्पतींमध्येही रोगप्रतिकारशक्ती तयार होऊ शकते का, याचे परीक्षण संशोधक करतात. याचे उत्तर नकारात्मक आल्यास लसीच्या पहिल्या टप्प्याचे पुन्हा परीक्षण केले जाते.

टप्पा 3 - क्लिनिकल ​​परीक्षण

लस तयार करण्यासाठी हा सर्वात महत्वाचा टप्पा असतो. कारण यात माणसांवर लसीची चाचणी केली जाते. दुसऱ्या टप्प्यात पोहोचलेले मोठ्या संख्येतील उमेदवार तिसऱ्या टप्प्यात अपयशी होतात. केवळ या टप्प्यातच 90 महिने किंवा 7 वर्षांपेक्षाही अधिक काळ लागण्याची शक्यता असते. या टप्प्याचे तीन भाग आहेत.

सुरुवातीला ही लस एका छोट्या समूहाला देण्यात येते. त्यांच्या शरीरात अँटिबॉडी तयार होतात का, हे यात तपासले जाते. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो किंवा चाचणीसाठी शेकडोंची संख्या असेल तर 6-8 महिन्यांचा कालावधी देखील लागू शकतो. त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते आहे का, याचे परीक्षण केले जाते. कोरोना विषाणूवरील लसीसाठी या टप्प्याचा कालावधी कमी करण्यात आला आहे. कोरोना लस बनवणाऱ्या काही औषध कंपन्यांनी दुसरा टप्पा पूर्ण केला आहे. त्यांना आता तिसऱ्या टप्प्यातील चाचाणीसाठी मंजुरी मिळाली आहे. यात हजारो स्वयंसेवकांना लस देऊन परीक्षण केले जाते की मोठ्या समूहावर लसीचा प्रभाव कशा प्रकारे होत आहे. यासाठी 6-8 महिन्यांचा वेळ लागू शकतो.

टप्पा 4 - नियामक आढावा

मानवी परीक्षणाच्या विविध चाचण्यांनंतर लसनिर्मीती सुरू करण्यापूर्वी लसीसाठी मंजुरी मिळवायची असते. सामान्यपणे यासाठी बराच वेळ लागतो, मात्र महामारीचा काळ असल्याने यासाठीही वेळ कमी करण्यात आली आहे.

चरण 5 - उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण

या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लसीच्या निर्मितीला सुरुवात केली जाते. त्यासाठी उत्पादक कंपनी आणि आर्थिक संसाधनांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

हेही वाचा - अहमदाबाद-पुणे-हैदराबाद, असा असेल पंतप्रधान मोदींचा कोरोना व्हॅक्सिन दौरा

Last Updated : Nov 28, 2020, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.