- नवी दिल्ली - बिहारमध्ये सत्ताविरोधी लाट व विरोधाचे कडवे आव्हान पार करून नितीश कुमार यांच्या नेतृत्वात रालोआने बिहारमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. या विजयामुळे उल्हासित भाजप नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात जल्लोष करत आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पार्टी अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नितिन गडकरींसह अन्य भाजपा नेते मुख्यालयात दाखल झाले आहेत.
सविस्तर वाचा : Bihar Election Victory Celebration : नितीश कुमारच राहणार बिहारचे मुख्यमंत्री, मोदींचे संकेत
- गोंदिया - गेल्या १० वर्षापासून पोलिसांच्या रडारवर असलेल्या जहाल नक्षलवाद्यास पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. रमेश मडावी(४५) असे या नक्षलवाद्याचे नाव आहे. रमेश हा १९९८-९९ मध्ये नक्षलवाद्यी कारवायामध्ये सामील झाला होता. रमेश मडावीला छत्तीसगडमधून अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा : गोंदिया पोलिसांच्या रडावर असलेला जहाल नक्षली छत्तीसगडमध्ये जेरबंद
- चंडीगड (हरियाणा) - पुष्पा निवास... रचना निवास... सानिया निवास... मनीषा निवास... नीशूचं घर ... संध्याचं घर अशी या मुलींच्या घरांची नावे आहेत. हे देशातलं असं पहिलं गाव जिथलं प्रत्येक घर घरातल्या मुलींच्या नावानं ओळखलं जातं. किरूरी असे या गावाचे नाव आहे.
सविस्तर वाचा : देशातील असे पहिले गाव, जिथे प्रत्येक घर मुलीच्या नावाने ओळखले जाते
- मुंबई - राज्यात आज ९,१६४ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५,९७,२५५ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२३ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ४,९०७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
सविस्तर वाचा : राज्यात आज ४,९०७ नवीन रुग्णांचे निदान, १२५ रुग्णांचा मृत्यू
- रत्नागिरी - एखादी गोष्ट अधिकृत असेल तर त्याबाबत भाजपा नेते किरीट सोमैय्या यांना आक्षेप असण्याचे कारण काय? असा सवाल परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला आहे. अन्वय नाईक कुटुंबीय आणि रश्मी ठाकरे यांच्यात जागेबाबत तसेच आर्थिक व्यवहार आहेत. हे व्यवहार का लपवण्यात आले? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबीयांशी जमिनीचे व्यवहार झाले आहेत.
सविस्तर वाचा : अधिकृत गोष्टीबाबत आक्षेप घेण्याचं कारण तरी काय?; परिवहनमंत्री अनिल परबांचा सोमैय्यांना सवाल
- भुवनेश्वर - ओडिशाच्या बालागीर जिल्ह्यातील गावात एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. यातील चौघांचे मृतदेह शहरातील ब्रह्मपुरा येथून ताब्यात घेण्यात आले. या घटनेत पती-पत्नीसह त्यांची चार मुले मृतावस्थेत आढळली.
सविस्तर वाचा : ओडिशाच्या एका गावात एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या
- बारामती (पुणे) - कमीत कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी द्राक्षाची शेती शेतकऱ्यांनी करावी, अशी अपेक्षा जपानच्या भारतीय राजदूतातील कौन्सिल जनरल मिशिहो हाराडा यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील बैठकीत व्यक्त केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निमंत्रणावरुन हाराडा हे बारामतीत आले होते. आज सकाळी त्यांनी येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन पाहणी केली, आणि भरभरून कौतुक केले, त्यावेळी ते बोलत होते.
सविस्तर वाचा : जपानचे कौन्सिल जनरल मिशिहो हाराडा बारामती भेटीवर; म्हणाले.. पवारांची जपानलाही गरज
- मुंबई - मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी अफलातून विजय मिळवला, अशा शब्दांत भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने मुंबई संघाचे कौतुक केले. मंगळवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या, आयपीएल २०२०च्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्ली संघाचा ५ गडी राखून पराभव करत जेतेपद पटकावले. या विजयानंतर सचिनने ही प्रतिक्रिया दिली.
सविस्तर वाचा : IPL 2020 : मुंबईच्या पाचव्या विजेतेपदाबाबत सचिन म्हणाला, अफलातून विजय....
- मेलबर्न - भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघामध्ये तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ नव्या जर्सीत दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने नव्या जर्सीच अनावरण केले आहे.
सविस्तर वाचा : टीम इंडियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ दिसणार नव्या जर्सीत
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एफ -35 लढाऊ विमानांच्या संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) च्या विक्री करण्यास मान्यता दिली. यावर काही कॉंग्रेस डेमोक्रॅटनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
सविस्तर वाचा : अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाची यूएईला एफ -35 जेट विक्रीस मान्यता