नवी दिल्ली – पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाचा आज ६३वा भाग प्रसारित होणार आहे. यामध्ये ते देशाला कोरोना महामारीबाबत संबोधित करणार आहेत, अशी माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात ते जनतेला संबोधित करतात.
दरम्यान, देशात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत देशभरात एकूण ९१८ रुग्ण आढळले असून, यांपैकी ८१९ अॅक्टिव्ह केसेस आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी ७९ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तर, १९ जणांचा यात बळी गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
हेही वाचा : लढा कोरोनाशी! भारतीय रेल्वेकडून प्रवासी गाड्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर