नवी दिल्ली - कोरोनाबाधित रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या चिंताजनक आहे. गेल्या २४ तासात देशभरात तब्बल ७८ हजार ७६१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. एका दिवसात आढळलेले हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण असून ९४८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
शनिवारी आढळून आलेल्या नवीन ७८ हजाराहून अधिक रुग्णांमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ३५ लाखांवर (३५,४२,७३४) गेली आहे. तर मृतांचा एकूण आकडा ६३ हजार ४९८ वर पोहोचला आहे. यामध्ये ७ लाख ६५ हजार ३०२ येवढी सक्रिय रुग्णसंख्या असून २७ लाख १३ हजार ९३४ रुग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
-
#CoronaVirusUpdates:
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) August 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
📍Total #COVID19 Cases in India(as on August 30, 2020)
➡️76.6% Cured/Discharged/Migrated (2,713,933)
➡️21.6% Active cases (7,65,302)
➡️1.8% Deaths (63,948)
Total COVID-19 confirmed cases = Cured/Discharged/Migrated+Active cases+Deaths
Via @MoHFW_INDIA pic.twitter.com/GgEqaQk0mo
">#CoronaVirusUpdates:
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) August 30, 2020

Via @MoHFW_INDIA pic.twitter.com/GgEqaQk0mo#CoronaVirusUpdates:
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) August 30, 2020
📍Total #COVID19 Cases in India(as on August 30, 2020)
➡️76.6% Cured/Discharged/Migrated (2,713,933)
➡️21.6% Active cases (7,65,302)
➡️1.8% Deaths (63,948)
Total COVID-19 confirmed cases = Cured/Discharged/Migrated+Active cases+Deaths
Via @MoHFW_INDIA pic.twitter.com/GgEqaQk0mo
राज्यातही शनिवारी सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले असून १६ हजार ८६७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत एका दिवसातील ही सर्वोच्च वाढ असून राज्यात शनिवारी ११ हजार ५४१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ५४ हजार ७११ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८५ हजार १३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक : आज सर्वाधिक 16 हजार 867 रुग्णांची नोंद, 328 मृत्यू