ETV Bharat / bharat

लालू प्रसादांच्या घरी 'हाय होल्टेज ड्रामा', तेज प्रताप यांच्या पत्नीचा सासू - नणंदेवर छळ केल्याचा आरोप

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहे

author img

By

Published : Sep 30, 2019, 10:22 AM IST

तेज प्रताप यांच्या पत्नीचा सासू - नणंदेवर छळ केल्याचा आरोप

पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहे. तेज प्रताप यांची पत्नी ऐश्वर्या यादव यांनी सासू आणि नणंदेवर छळ केल्याचा आरोप केला आहे.

राबडी देवी यांच्या निवासस्थानी रविवारी हाय होल्टेज ड्रामा झाला होता. राबडी देवी यांनी ऐश्वर्या यांना घराच्या बाहेर काढले होते. त्यानंतर घरात प्रवेश मिळावा म्हणून ऐश्वर्यासह तिचे वडील चंद्रिका रॉय आणि आई प्रमिला घराच्या गेटबाहेर उपस्थित होते. पोलिसांनी राबडी देवी यांच्याशी बोलणी केल्यानंतर रात्री १ वाजता ऐश्वर्या यांना घरात प्रवेश मिळाला आहे.

ऐश्वर्या यांनी लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवीवर गंभीर आरोप केले आहेत. राबडी देवी आणि माझी मोठी नणंद आमचे पती-पत्नीचे नाते तोडण्याचा प्रयत्न करत आहे. जून महिन्यापासून येथे मला जेवन दिले जात नसून माझ्या वडिलांच्या घरून मला जेवन येत आहे, असे ऐश्वर्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

बिहारचे माजी वाहतूक मंत्री चंद्रिका राय यांची मोठी मुलगी ऐश्वर्याबरोबर तेज प्रताप यांचा विवाह मे २०१८ मध्ये मोठ्या थाटामाटात झाला होता. नोंव्हेबर २०१८ मध्ये तेजप्रताप यांनी घटस्फोटासाठी कौटुंबीक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जो पर्यंत निर्णय होत नाही. तोपर्यंत ऐश्वर्या आपल्या सासरी राहतील असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Intro:Body:

aishwarya

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.