रांची - तुरुंगात असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालु प्रसाद यादव यांना रिम्स निर्दशकांच्या बंगल्यावर उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस पासून त्यांचा बचाव करण्यासाठी सुरक्षिततेचे हे पाऊल ऊचलण्यात आले आहे.
रिम्सचे डॉ. मंजू गरी यांनी दिलेली माहिती अशी, की लालू प्रसाद यादव यांचे काही खासगी सुुुरक्षारक्षक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापूर्वी 24 जुलैला लालु प्रसाद यादव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली मआहे. त्यांच्या दोन बाधित सुुुरक्षारक्षकांना सध्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर एकाला रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.